मृत्यूचा जनरेटर : शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल ‘त्या’ ६ मृत्यूचे कारण...

खासगी डॅाक्टरांच्या म्हणण्यानुसार हा विषबाधेचा प्रकार असावा. जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी कार्बन मोनॉक्साईडमुळे गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, त्यांच्या रक्ताच्या नमुने आणि व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.
Sarkarnama Banner.
Sarkarnama Banner.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथे जनरेटर संचाच्या धुराने एका कुटुंबातील सहा जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या घरातील जनरेटरला मृत्यूचा जनरेटर संबोधू जाऊ लागले. त्या सहा जणांचा मृत्यू जनरेटरमधून निघालेल्या कार्बन मोनॉक्साईडने त्यांच्या श्वास गुदमरून त्यांचा जीव गेला असावा, असे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. 
 

दुर्गापुरातील वॅार्ड क्रमांक तीनमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. अजय लष्करे (वय २१), माधुरी लष्करे (२०), रमेश लष्करे (४५), लखन लष्करे (१०), कृष्णा लष्करे (८) आणि पूजा लष्करे (१४) अशी मृतांची नावे आहे. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर नायब तहसीलदार सचिन खंडारे आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश लष्करे यांची पत्नी दासू लष्करे हिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सोमवारी रात्री वीज नसल्यामुळे लष्करे कुटुंबीयांनी जनरेटरने वीज सुरू केली व सर्व झोपी गेले. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उशिरापर्यंत बंद असल्यामुळे शेजाऱ्यांनी खिडक्या उघडून बघितले. तेव्हा आत सर्वत्र काळा धूर पसरला होता. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला असता घरातील सातही जण बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यातील सहा जणांना मृत घोषित केले. रमेश लष्करे यांची पत्नी दासू लष्करे हीच बचावलेली एकमेव व्यक्ती आहे. 

खासगी डॅाक्टरांच्या म्हणण्यानुसार हा विषबाधेचा प्रकार असावा. जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी कार्बन मोनॉक्साईडमुळे गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, त्यांच्या रक्ताच्या नमुने आणि व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com