अजनी इंटरमॉडेल स्टेशन : वृक्षतोडीविरुद्ध नागपूर सिटिझन्स फोरमचा एल्गार... - ajni intermoden station nagpur citizen forum against deforestation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

अजनी इंटरमॉडेल स्टेशन : वृक्षतोडीविरुद्ध नागपूर सिटिझन्स फोरमचा एल्गार...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

शहरातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ज्या महानगरपालिकेवर आहे, त्याच महानगरपालिकेने वृक्षतोडीसाठी परवानगी देणे, हे सर्वथा दुर्दैवी असल्याचे फोरमचे सदस्य अभिजित झा यांनी म्हटले आहे. मनपाने दिलेली जाहिरात तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी Ajni Railway Colony येथे इंटरमॉडल स्टेशन Intermodel station होऊ घातले आहे. पण या प्रकल्पासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. The trees will be cut down नागपूर सिटिझन्स फोरमने वृक्षतोडीला विरोध केला आहे. महानगरपालिका उद्यान विभागाचे अधीक्षक व वृक्ष अधिकाऱ्यांना फोरमच्या सदस्यांनी आज रोपटे देऊन वृक्षसंवर्धनाची आठवण करून दिली. Forum members reminded us of tree planting by giving saplings today महानगरपालिकेने Nagpur Municipal Corporation दिलेली जाहिरात परत घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. 

निवेदन देताना फोरमचे अभिजित झा, अमित बांदूरकर, प्रतीक बैरागी, अभिजित सिंह चंदेल, वैभव शिंदे पाटील होते. फोरमने आपल्या लेखी आक्षेपांमध्ये प्राणवायूच्या नैसर्गिक स्रोतांचे होणारे नुकसान, सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे, मनपाने झाडांविषयी सविस्तर माहिती न देणे, नॅशनल हायवे ॲथॉरिटीची भूमिका, वृक्षारोपण व वृक्ष प्रत्यारोपणासंदर्भातील पूर्व इतिहास, पर्यावरणीय मूल्यांकन न होणे, वृक्षांच्या 56 प्रजाती व पक्ष्यांचा अधिवास नष्ट होण्याची भीती अशा विविध मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

शहरातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ज्या महानगरपालिकेवर आहे, त्याच महानगरपालिकेने वृक्षतोडीसाठी परवानगी देणे, हे सर्वथा दुर्दैवी असल्याचे फोरमचे सदस्य अभिजित झा यांनी म्हटले आहे. मनपाने दिलेली जाहिरात तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. लोकांनी वृक्षारोपण करून झाडे जगवावी, यासाठी महानगरपालिका आपल्या प्रत्येक कार्यक्रमात रोपटी भेट म्हणून देते. तर दुसरीकडे तिच महानगरपालिका वृक्षतोडीसाठी जाहिरात कशी काय काढू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबाबतीत प्रथम नागरिक म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. 

हेही वाचा : … आणि तेव्हा आम्ही राज्य सरकारला जाब विचारू : देवेंद्र फडणवीस

अजनी रेल्वे कॉलनीतील वृक्षतोडीला नागरिकांचा विरोध होत असतानाही हा विरोध झुगारून वृक्षतोडीसाठी पावले उचलणे लोकविरोधी असल्याचे फोरमचे सदस्य अमित बांदूरकर यांनी म्हटले आहे. शहरातील सर्वपक्षीय जनप्रतिनीधींना घेराव घालून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी बाध्य करू, असा इशारा त्यांनी दिला. इंटरमॉडेल स्टेशन प्रकल्पासाठी पर्याय उपलब्ध असताना शहराच्या मधोमध हा प्रकल्प आणून पर्यावरण नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप फोरमच्या सदस्यांनी केला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख