फडणवीसांच्या त्या शपथविधीची पुनरावृत्ती ! पहाटे भाजपने सदस्य पळविला, सकाळी राष्ट्रवादीत मायघरी आणला - Repetition of that oath of Fadnavis! In the morning, the BJP kidnapped the members and in the morning brought the NCP home | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांच्या त्या शपथविधीची पुनरावृत्ती ! पहाटे भाजपने सदस्य पळविला, सकाळी राष्ट्रवादीत मायघरी आणला

मार्तंड बुचुडे
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

नाट्यमय घडामोडीनंतर लोणी हवेलीच्या सरपंचपदी व उपसरपंच आमदार नीलेश लंके यांचे समर्थक असलेले जान्हवी बाजीराव दुधाडे व अमोल विक्रम दुधाडे यांची नवड झाली.

पारनेर ः  पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी महाराष्ट्राने अनुभवला. त्याचाच कित्ता पारनेर तालुक्यातील लोणीहवेली येथे गिरवला गेला. रात्रीतून भाजपने राष्ट्रवादीचा सदस्य पळविला. पहाटे मंदिरात त्याला शपथ देऊन उपसरपंच करण्याचे आश्वासन दिले. सकाळी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांना ही बाब समजताच, त्यांनी हा डाव उलटविला. पुन्हा त्याला राष्ट्रवादीत खेचून आणले. व सरपंच राष्ट्रवादीचाच झाला. 

नाट्यमय घडामोडीनंतर लोणी हवेलीच्या सरपंचपदी व उपसरपंच आमदार नीलेश लंके यांचे समर्थक असलेले जान्हवी बाजीराव दुधाडे व अमोल विक्रम दुधाडे यांची नवड झाली.

हेही वाचा... राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई

लोणी हवेली ग्रामपंचायत निवडणूक सुरूवातीला बिनविरोध करण्यासाठी आमदार लंके यांनी प्रयत्न केले. निकालानंतर भाजपला 4, तर महाविकास आघाडीला 5 जागा मिळाल्या. त्या आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राहिल्या. या घडामोडीत भाजपचा सरपंच होण्यासाठी भाजपनेत्यांनी डाव टाकला. राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडला. त्याला उपसरपंचपद देण्याचे कबूलही केले. त्यासाठी महादेवाच्या मंदिरात पहाटेच शपथ घेण्यात आली. त्यामुळे भाजपचे 5 व राष्ट्रवादीकडे 4 सदस्य राहतील, अशी स्थिती निर्माण झाली.

हेही वाचा... नगरला बनवायचंय नंबर वन

या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी आमदार लंके यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर लंके यांनी तातडीने कार्यकर्त्यांमार्फत सुत्रे हलवून संबंधित पळालेला सदस्य पुन्हा राष्ट्रवादीत खेचून आणला. त्यामुळे भाजपचे सरपंचपदाचे स्वप्न व संबंधित सदस्याचे उपसरपंच होण्याचे स्वप्न औटघटकेचे ठरले.

राष्ट्रवादीचे सदस्य ः अशोक दुधाडे, जान्हवी कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे व अमोल दुधाडे. भाजपचे सदस्य ः शत्रुघ्न नवघन, संजीवनी दुधाडे व इतर दोघे सदस्य.

हेही वाचा... 

तोडलेल्या दुभाजकांची दुरुस्ती सुरू 

पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील दुभाजक अनेक ठिकाणी अनधिकृतपणे तोडल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आल्याची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच महामार्ग सुरक्षा विभाग, तसेच "टोल'वसुली करणाऱ्या चेतक एंटरप्रायझेस कंपनीला जाग आली. अनधिकृतपणे तोडलेले अनेक दुभाजक आता बंद करण्यास त्यांनी पोलिस बंदोबस्तात सुरवात केली आहे. 

पारनेर तालुक्‍यात नगर-पुणे महामार्ग सुमारे 27 किलोमीटर आहे, सुपे-नगर हे अंतरही सुमारे 30 किलोमीटर आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. पुणे, औरंगाबाद, तसेच अन्यत्र जाणारी वाहने या मार्गानेच प्रवास करतात. रस्ता चौपदरी व सुस्थितीत असल्याने पूर्वीपेक्षा वाहनांचा वेग वाढता असल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. 

अपघातात मृत्यू किंवा अपंगत्वामुळे असंख्य कुटुंबे उद्‌ध्वस्त होतात. अपघातांचे मुख्य कारण वाहनांचा वाढता वेग व रस्त्यांची दुरवस्था. त्यातच ठिकठिकाणी दुभाजक अनधिकृतपणे तोडले गेले आहेत. याबाबत "सकाळ'ने आवाज उठवला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक सुरक्षा विभाग व "टोल' वसूल करणारी यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी आता असे दुभाजक पुन्हा बंद करण्यास सुरवात केली आहे. यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. अपघातांची संख्या कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख