कारखान्यातील घोटाळे झाकण्यासाठी पक्षबदल ! शेलार यांचा नागवडेंवर आरोप - Party change to cover factory scams! Shelar accuses Nagwade | Politics Marathi News - Sarkarnama

कारखान्यातील घोटाळे झाकण्यासाठी पक्षबदल ! शेलार यांचा नागवडेंवर आरोप

संजय आ. काटे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

परभणीत राजेंद्र नागवडे यांचा खासगी साखर कारखाना आहे. येथील कामगार व साहित्य ते कायम त्या कारखान्यासाठी वापरतात. बापूंनी उभा केलेला हा सहकारी साखर कारखानाही खासगी करण्याचा डाव अध्यक्ष या नात्याने ते आखत आहेत.

श्रीगोंदे : "ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याची सत्ता सामान्यांसाठी वापरली. मात्र, त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे कारखान्याची सत्ता त्यांचा खासगी कारखाना वाढवून त्यातून स्वहित साधण्यासाठी वापरत आहेत. कारखान्यातील गैरव्यवहार झाकण्यासाठी कॉंग्रेस व भाजप असा सतत पक्षबदल करून ते "सेफ' होण्याचा प्रयत्न करीत आहेत,'' असा आरोप कारखान्याचे संचालक अण्णा शेलार यांनी केला. 

हेही वाचा... दुर्गा तांबे यांनी जपला हा छंद

नागवडे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, ""परभणीत राजेंद्र नागवडे यांचा खासगी साखर कारखाना आहे. येथील कामगार व साहित्य ते कायम त्या कारखान्यासाठी वापरतात. बापूंनी उभा केलेला हा सहकारी साखर कारखानाही खासगी करण्याचा डाव अध्यक्ष या नात्याने ते आखत आहेत. कारखान्यातील गैरव्यवहार बाहेर येऊ नयेत यासाठी ते, जो पक्ष सत्तेत येईल अथवा येण्याची शक्‍यता आहे, त्या पक्षात प्रवेश करतात. भाजप सत्तेवर येणार याची चाहूल लागताच त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर लगेच "कॉंग्रेस झिंदाबाद'चा प्रयत्न झाला. कारखाना निवडणुकीत हा सगळा गोंधळ सभासदांसमोर मांडणार आहोत.'' 
माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे, ऍड. बाळासाहेब काकडे, शांताराम भोईटे, ऍड. बापूसाहेब भोस आदी उपस्थित होते.

हेही वाचा... आता भाजपचे युवा वाॅरिअर्स 

निविदांची पाकिटे अध्यक्षांच्या घरी 

नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर म्हणाले, ""कारखान्याच्या कामाच्या निविदांची पाकिटे संचालक मंडळाऐवजी अध्यक्षांच्या घरी फोडली जातात. सगळेच "मॅनेज' करून सुरू आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे; मात्र ठेकेदाराला सगळे पेमेंट अदा केले. इकडे कामगारांचे चार महिन्यांचे पगार थकले आहेत. आता विस्तारीकरणाच्या नावाखाली कर्ज काढून ते सभासदांना देत, त्यांचा कारभार कसा चांगला आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे.'' 

हेही वाचा...

पोलिसांचा चाप

श्रीगोंदे : कोरोना संकट पुन्हा गडद होऊ लागल्याने चेहऱ्यावर पट्टी न लावता शहरात वाहनांवर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी चाप दिला. सुमारे पन्नास लोकांवर दंडात्मक कारवाई केली.

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी स्वतः शहरात फिरत ही कारवाई केली. शहरातील बस सस्थानक, शनिचौक, जोतपुर मारुती चौक, झेंडा चौक, काळकाई चौक आशा वेगवेगळ्या ठिकाणी थांबून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाश्वभूमीवर ढिकले व त्यांच्या पथकाने कारवाई करतानाच मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्स पाळणे बाबत जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याबाबत योग्य सूचना दिल्या. 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख