भाषणे ठोकून जनतेची दिशाभूल करणारांची संख्या तालुक्यात वाढली : आमदार लंके - The number of people misleading the people by making speeches has increased in the taluka: MLA Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

भाषणे ठोकून जनतेची दिशाभूल करणारांची संख्या तालुक्यात वाढली : आमदार लंके

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

अशा प्रकारची भाषणे ठोकणारांची संख्या तालुक्यात वाढली आहे. माझा मात्र भाषण ठोकण्यापेक्षा तालुक्याच्या विकास कामांवर भर आहे.

पारनेर : विकासाच्या नावाखाली मोठ मोठी भाषणे करून लोकांची दिशाभूल करण्याचे विरोधकांचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद (ZP) किंवा 15 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून लाख दोन लाख रूपयांची कामे आणून भाषणे करून विरोधक स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. अशा प्रकारची भाषणे ठोकणारांची संख्या तालुक्यात वाढली आहे. माझा मात्र भाषण ठोकण्यापेक्षा तालुक्याच्या विकास कामांवर भर आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. (The number of people misleading the people by making speeches has increased in the taluka: MLA Lanka)

लंके यांच्या हस्ते तराळवाडी, बुगेवाडी, सोबलेवाडी व महाजन मळा येथे सुमारे एक कोटी 10 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा लोकार्पणप्रसंगी लंके बोलत होते.
या वेळी तराळवाडी ते लोणी येथील सुमारे 12 लाख 45 हजार रूपयांचा पुल, महाजन मळा येथील नऊ लाख 85 हजार रूपयांचा पुल, 37 लाख रूपयांचा सोबलेवाडी ते बुगेवाडी रस्ता, 27 लाखा रूपयांचा बुगेवाडी ते सोंडवस्ती रस्ता व 17 लाख रूपयांची बुगेवाडी स्मशानभूमी, यासह अनेक विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा झाला. 

या प्रसंगी नगरसेविका विजेता सोबले, विलास सोबले, उद्योजक विजय औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, राजेश चेडे, आनंदा औटी, डॉ. मुदस्सर सय्यद, दत्तात्रय कुलट , सहदेव तराळ, दिनेश औटी व साहेबराव देशमाने आदींसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

लंके म्हणाले, की पारनेर शहरासह वाड्या- वस्तीवरील शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते व पाणी यांच्यासह मूलभूत सेवा सुविधा सोडवण्यावर माझा भर आहे. कोरोना काळात निधीची टंचाई असतानाही पारनेर तालुक्याला जास्तीत जास्त झुकते माप देण्याचे आपण प्रयत्न केला आहे, असेही लंके म्हणाले.

हेही वाचा..

कोरोच्या संकटाच्या काळात आशा पल्लवीत

पारनेर : तालुक्यात यावर्षी रोहिणीचा अनेक ठिकाणी समधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोरोना संकटाच्या काळातही अशा पल्लवीत झाल्या होत्या. यंदा चांगला पाऊस होणार, या आशेने अनेकांनी खरीपाच्या विविध पिकांची पेरणी केली होती. मात्र आता पावसाने गेल्या आठ दिवसांपासून पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर पेर वाया जाण्याच भिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात रोहीणीचा पाऊस झाला. त्या नंतर मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून कोरडेच चालले आहे. मात्र रोहिणीच्या पाऊसावर तालुक्यातील अनेक शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. तर सध्याही काही शेतकरी धूळवाफेवर पेरणी करत आहेत. मात्र अता पाऊसाने ऊघडीप दिल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लाऊन बसला आहे.जर येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर पेर वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
 

 

हेही वाचा..

हा असेल माझ्या आनंदाचा क्षण

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख