अजित पवार व  माझ्यात कोणतीही बैठक झाली नाही ः राम शिंदे यांचे स्पष्टीकरण - No meeting between Ajit Pawar and me: Ram Shinde's explanation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

अजित पवार व  माझ्यात कोणतीही बैठक झाली नाही ः राम शिंदे यांचे स्पष्टीकरण

दत्ता उकिरडे
रविवार, 13 जून 2021

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून प्रा.शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता.

नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार व माझ्यात कोणतीही गुप्त बैठक झाली नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले आहे. (No meeting between Ajit Pawar and me: Ram Shinde's explanation) पवार-शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा कर्जत तालुका व राज्यात सुरू झाली होती. यावर शिंदे यांनी खुलासा केला.

कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार व भाजपचे माजी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी राम शिंदे यांच्यात शनिवारी (ता. १२) अर्धा तास गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. (Deputy Chief Minister Ajit Pawar) मात्र अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे शिंदे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

राज्यात सध्या राजकीय नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. दिल्लीत मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट. (Ex Minister Ram Shinde) रणनितीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची झालेली प्रदीर्घ भेट आणि काल कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील भेट. याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याचेही बोलले जाते.

ही बैठक राज्याच्या राजकारणाशी निगडीत होती की कर्जत-जामखेड मतदारसंघाशी, अथवा आगामी लक्षवेधी राजकीय घडामोडीबाबत. या बैठकीत नेमकी कोणती डाळ शिजली याचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिले. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री पवार व माजी मंत्री शिंदे या दोघांमध्ये अंबालिका साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत बैठक झाल्याचे बोलले जाते.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून प्रा.शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. आमदार रोहित पवार व प्रा.शिंदे यांच्या समर्थकांकडून कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध प्रश्नावर एकमेकांना लक्ष्य केले जात आहे. असे असताना ही बैठक कोणती खिचडी शिजवण्यासाठी झाली, असेल याची उत्सुकता पवार व शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना लागली आहे.

राम शिंदे हे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जात असल्याने त्यांचा काही निरोप घेऊन अजित पवारांना भेटले असतील काय,  ही भेट राज्यातील घडामोडीची नांदी तर  नसेल अशा चर्चांही रंगल्या. पण शिंदे यांनी अशी कुठलीच गुप्त भेट त्यांच्यात व अजित पवार यांच्यात झाली नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

हे ही वाचा ः तरच ओबीसींचे प्रश्न सुटतील..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख