नाना पाटेकर यांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट, काय म्हणाले नाना - Nana Patekar was met by MLA Rohit Pawar, what did Nana say | Politics Marathi News - Sarkarnama

नाना पाटेकर यांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट, काय म्हणाले नाना

वसंत सानप
गुरुवार, 17 जून 2021

कोणत्याही कामासाठी मदत मागणारे अनेक हात असतात. मात्र प्रत्यक्षात मदत मिळाली आणि काम साकारल्यानंतर मदत करणाऱ्यांना भेटून त्यांची कृतज्ञता व्यक्त करणारे मोजकेच असतात.

जामखेड : कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांत पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब आडवण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प साकारण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांची त्यांनी मदत घेतली. तसेच मदत करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करण्याचा अनोखा ‘फंडा’ हाती घेतला असून, पहिल्या टप्प्यात नाना पाटेकर यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच केलेल्या सहकार्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. (Nana Patekar was met by MLA Rohit Pawar, what did Nana say)

कोणत्याही कामासाठी मदत मागणारे अनेक हात असतात. मात्र प्रत्यक्षात मदत मिळाली आणि काम साकारल्यानंतर मदत करणाऱ्यांना भेटून त्यांची कृतज्ञता व्यक्त करणारे मोजकेच असतात. हेच काम आमदार रोहित पवार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेड तालुक्यात जलसंधारणाची कोट्यवधी रुपये अंदाजपत्रकीय खर्च असणारी कामे लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मोठ्या खुबीने सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जैन संघटना (बीजीएस), सकाळ रिलीफ फंड, बारामती ॲग्रो, नाम फाउंडेशन, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यासह इतर विविध संस्थांची मदत निरनिराळ्या कामांसाठी त्यांनी आजतागायत घेतलेली आहे.

यामध्ये सर्व ठिकाणी 'नाम फाऊंडेशन' ही संस्था जलसंधारणाच्या कामात सर्वसाधारणपणे अग्रेसर आहे. या संस्थेचे राज्यभर कामे सुरु असून कर्जत -जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये जलसंधारणाच्या कामाला मोठी मदत त्यांची मिळालेले आहे. म्हणून या संस्थेचे सर्वेसर्वा सिनेअभिनेते नाना पाटेकर यांची आमदार रोहित पवारांनी समक्ष भेट घेतली आणि नाम फाउंडेशन च्या पुढाकाराने राज्यभर सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले तर कर्जत जामखेड मध्ये होत असलेल्या कामांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल 'कृतज्ञता' व्यक्त केली.

जलसंधारणाची कामे बनली लोकचळवळ !

कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके आवर्षण प्रवण क्षेत्रात मोडणारे तालुके पाटपाण्याची बारमाही सुविधा नसल्याने (काही भाग सोडून) हंगामी शेतीवरच आधारभूत असलेले तालुके पाण्याच्या बाबतीत सक्षम व्हावेत, याकरिता जलसंधारणाच्या कामांना आमदार रोहित पवारांनी प्राधान्य दिले आहे. स्वयंसेवी संस्था-लोकसहभागातून तीस गावांमध्ये सध्या कामे सुरू आहेत. 

 

हेही वाचा..

मराठा समाजाची दिशाभूल

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख