माजी सरपंचाच्या हत्याकांडातील आरोपीचा पॅरोलवर असताना खून, नारायगव्हाण येथील प्रकार - Murder of accused on leave while on parole, type at Narayagavan | Politics Marathi News - Sarkarnama

माजी सरपंचाच्या हत्याकांडातील आरोपीचा पॅरोलवर असताना खून, नारायगव्हाण येथील प्रकार

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 11 जून 2021

नारायणगव्हाण येथीलच सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांची १३ नोव्हेंबर २०१० रोजी नगर-पुणे महामार्गावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात राजाराम शेळके व त्यांच्या मुलगा यांनाजन्म ठेपेची शिक्षा झालेली आहे.

पारनेर : नारायणगव्हाण येथील माजी सरपंच व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर पॅरोलवर रजा उपभोगीत असलेल्या राजाराम शेळके (Rajaram Shelke) यांची आज (ता. ११ ) त्यांच्या शेततच आज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करूण हत्या केली.ही झटना आज दुपारच्या दरम्यान घडली असावी असा आंदाज आहे. (Murder of accused on leave while on parole, type at Narayagavan)

नारायणगव्हाण येथीलच सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांची १३ नोव्हेंबर २०१० रोजी नगर-पुणे महामार्गावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात राजाराम शेळके व त्यांच्या मुलगा यांनाजन्म ठेपेची शिक्षा झालेली आहे. ही शिक्षा सध्या तो भोगत आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना पॅरोल रजेवर सोडण्यात आले आहे. ते सध्या सुट्टीवर असल्याने आपल्या नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना ही घटणा घडली. त्यांच्यावर हल्ला झाल्या नंतर त्यांना शिरूर येथील खजगी दवाखाण्यात हलविण्यात आले आहे. मात्र  उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.    

आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असावी, असा पोलिसांचा आंदाज आहे. शेळके हे त्यांच्या शेतात एकटेच काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सुमारे १० वर्षापुर्वी कांडेकर यांची डोक्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. या गुन्हयात शेळके यांच्यासह इतर १४ आरोपी होते. त्यात शेळके यांच्यासह त्यांचा मुलाचाही समावेश होता. दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली असून, ते शिक्षा भोगत आहेत.  

पॅरोलची रजेवर असल्याने ते आपल्या गावातीलच नारायणगव्हाण येथील कुकडी कालव्याच्या शेजारी असलेल्या शेतात काम करत असत. आजही शेतात काम करत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शेळके यांना पॅरोलवरची रजा भोवली. ते जर पॅरोलवरच्या रजेवर सुटले नसते, तर शेळके यांची हत्या झाली नसती. तसेच त्यांच्यावर असलेल्या खुनाचा आरोपाचा तर हा बदला नाही ना, अशी चर्चाही आता तालुक्यात सुरू झाली आहे.

 

हेही वाचा...

पारनेरमध्ये जनता कर्फ्यू

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख