म्युकरमायकोसिसचा रुग्ण गमावल्याने आमदार राजळेंनी प्रशासन केले अलर्ट - MLA Rajale administers alert due to loss of mucormycosis patient | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

म्युकरमायकोसिसचा रुग्ण गमावल्याने आमदार राजळेंनी प्रशासन केले अलर्ट

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला बळी गेला आहे. तीन जण उपचार घेत आहेत. आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

पाथर्डी : ‘‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अखेरच्या टप्प्यात महसूल, पोलिस, नगरपालिका, पंचायत समिती व आरोग्य विभागाने चांगले काम केले. कोविडच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने अलर्ट राहावे,’’ अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या.

तालुक्यात म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला बळी गेला आहे. तीन जण उपचार घेत आहेत. आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. तीत त्या बोलत होत्या. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्‍याम वाडकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक कराळे, डॉ. भगवान दराडे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, पंकज नेवसे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, सोमनाथ खेडकर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थित होते.

या वेळी तालुक्यातील कोरोना स्थितीबाबतची आकडेवारी तहसीलदार वाडकर यांनी मांडली. आगामी काळात येणाऱ्या लाटेला सामोरे जाताना योग्य ती पूर्वतयारी करावी, अशा सूचना राजळे यांनी या वेळी दिल्या.

कोरोनाबाबत काळजी घ्यावी

तालुक्यातील कोल्हार गावातील एका व्यक्तीचा म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झाला आहे. तालुक्यात आणखी तीन रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जनतेने कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस आजाराबाबतही काळजी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी केले आहे.

 

हेही वाचा...

सरकार शिक्षणाची जबाबदारी का घेत नाही

संगमनेर : जनतेला दारु पाजण्याची जबाबदारी स्विकारीत सरकार दारुची बंद दुकाने सुरु करीत आहे. मात्र शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मोफत शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत छात्रभारती संघटनेने संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या निवेदनात कोरोना काळात शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी सरकारने स्वीकारुन विद्यार्थ्यांची लुट थांबवायला हवी. कोरोना महामारीत शाळा, महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या दरम्यान लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. कित्येक कुटूंबे रस्त्यावर आली असून, अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आर्थीक डोलारा ढासळला आहे. मात्र या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्ण वसूल केले जात आहे. सरकार व संस्थाचालक संगनमताने विद्यार्थ्यांची फसवणूक करून लूट करीत आहेत. परंतु सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहात नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा..

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल

 

 

 

 

Edited by - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख