हिम्मत असेल, तर माझा राजीनामा घ्या ! `अगस्ती`प्रश्नी मधुकर पिचड चिडले - If you have the courage, resign me! `Agusty Madhukar Pichad | Politics Marathi News - Sarkarnama

हिम्मत असेल, तर माझा राजीनामा घ्या ! `अगस्ती`प्रश्नी मधुकर पिचड चिडले

शांताराम काळे
सोमवार, 14 जून 2021

खोटे-नाटे अर्ज पाठवून कारखान्याची बदनामी करीत आहेत. ज्यांनी पिठाची गिरणी चालवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये.

अकोले : तुमच्यात हिमत असेल, तर माझाही राजीनामा घ्या. शेतकरी बांधिलकीतून आम्ही काम करतो. यापूर्वी चुकीच्या पद्धतीने कारखाना (Agasti sugar Facture) बंद पडला होता, मात्र तो पुन्हा उभा केला .तालुक्यातील काही मंडळी हा कारखाना बंद पाडून विकण्यासाठी सरसावले आहेत. खोटे-नाटे अर्ज पाठवून कारखान्याची बदनामी करीत आहेत. ज्यांनी पिठाची गिरणी चालवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. अगस्तीचे कर्ज फेडून तो सक्षमपणे चालवूच, असा विश्वास माजी मंत्री व अगस्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. (If you have the courage, resign me! `Agusty Madhukar Pichad)

निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन अगस्तीच्या संचालक मंडळ टोळी असल्याचा आरोप करून कारखाना शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत तसेच जिल्हा सहकारी बँकेकडे अर्ज देऊन अगस्तीला कर्ज देऊ नये, असे पत्र दिले. तसेच राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली, याबाबत आज अगस्ती कारखान्यावर अगस्तीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व संचालकांनी बैठक घेऊन आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली.

या वेळी सीताराम गायकर यांनी कारखान्याचा अहवाल मांडताना किती अडचणीतून हा कारखाना चालविला, हे विषद केले. ते म्हणाले, की आम्ही अगस्ती सक्षमपणे चालवत असून, काही मंडळी शेतकरी, बँक व सरकारला चुकीची माहिती पसरवीत आहेत. दुर्दव्याने हा कारखाना बंद पडला, तर पुन्हा कारखाना उभा राहणे अशक्य आहे. कारखान्याचे भाग भांडवल, साखरेचे, उत्पादन कर्ज याबाबत सर्व लेखा जोखा मांडताना काही लोक सभासदांची दिशाभूल करून कारखान्याची चौकशी लावली आहे. चौकशी होईपर्यंत गप्प रहा. त्यात दोषी आढळले, तर सर्व संचालक जबाबदार राहून भरपाई करू, मात्र खोटे आरोप सहन होत नाही. 25 वर्षात यावर्षी हंगाम चांगला पार पडला. 6. 5 लाख मेट्रिक टन गाळप झाले. 184 कोटी खेळते भांडवल आहे इथेनॉल प्रकल्प 51 कोटींचा आहे, असे सांगितले.

 

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख