कोरोना कमी होतोय ! दिवसभरात वाढले कोरोनाचे ४८३ रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४८३ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ७३ हजार पाच झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची संख्या तीन हजार ९९३ झाली आहे.
Antijan test.jpg
Antijan test.jpg

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४८३ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ७३ हजार पाच झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची संख्या तीन हजार ९९३ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५९ रुग्ण श्रीगोंदे तालुक्‍यात आढळले.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील तपासणीत १८, खासगी प्रयोगशाळांतील तपासणीत २५९, तर रॅपिड अँटिजेन तपासणीत २०६ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत चार हजार ६५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या ३२६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ६४ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत.

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः राहुरी ५९, शेवगाव ४६, कर्जत, पाथर्डी व श्रीरामपूर- प्रत्येकी ३९, संगमनेर व नेवासे- प्रत्येकी ३८, पारनेर व श्रीगोंदे- प्रत्येकी ३७, जामखेड २८, अकोले २१, कोपरगाव १७, नगर शहर १५, राहाता १३, नगर तालुका ११ व भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत एक, परजिल्ह्यांतील ५ रुग्ण आढळले.

हेही वाचा...

बेलवंडी बनतेय कोरोना हॉटस्पॉट

श्रीगोंदे : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण कमी होत असतानाच, बेलवंडी येथे मात्र संख्या कमी होत नसल्याने गावकरी व प्रशासन चिंतेत आहे. गावात आजही ॲक्टिव्ह ४८ रुग्ण आहेत. रुग्णसंख्या वाढण्याची कारणे शोधून गावकऱ्यांनी आता कोरोनाच्या हद्दपारीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणा गावात नेमकी काय करते, याचाही शोध घ्यावा लागणार असल्याने, अधिकाऱ्यांनी बेलवंडीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

तालुक्यात काष्टीनंतर आता बेलवंडी आर्थिक सुबत्ता असणारे गाव होत आहे. तेथील व्यापार, शेतीउत्पादन व राजकारण वाढत असतानाच आता कोरोनाही वाढतोय, ही चिंतेची बाब आहे. गावात आतापर्यंत कोरोनाबाधित ७०० रुग्ण आढळले आहेत. सध्या अॅक्टिव्ह ४८ रुग्ण असून, २१ जणांना जीव गमवावा लागला आहे.

गावकऱ्यांनी एकत्र येत काही उपाययोजना केल्या; मात्र तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचे वास्तव आहे. ग्रामपंचायत पुरेपूर प्रयत्न करीत आहे. तथापि, कोरोना चाचण्या करण्यास लोक घाबरले आहेत का, याचा शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा..

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com