आजीचा मृत्यू, त्यात डाॅक्टरांकडून नातवाला मारहाण !पक्के बिले मागितल्याचे कारण - Grandmother's death, including the beating of her grandson by the doctors! The reason for asking for fixed bills | Politics Marathi News - Sarkarnama

आजीचा मृत्यू, त्यात डाॅक्टरांकडून नातवाला मारहाण !पक्के बिले मागितल्याचे कारण

आनंद गायकवाड
मंगळवार, 8 जून 2021

उपचार सुरु असतांना खतोडे यांनी त्यांना 60 हजार रुपये हॉस्पिटल व 35 हजार रुपये मेडिकलचे असे 95 हजार रुपये भरले. त्यापोटी त्यांनी मेडिकलची कच्ची पावती दिली.

संगमनेर : कोविडची (Corona) बाधा झालेल्या आजीला उपचारार्थ संगमनेर शहरातील वाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या हॉस्पिटलचे उर्वरित बील अदा करण्यासाठी प्रिस्क्रिप्शन व पक्क्या बिलाची मागणी करणाऱ्या नातवाला डॉ. वाणी व त्यांच्या स्टाफने लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळी केल्याची घटना काल घडली. (Grandmother's death, including the beating of her grandson by the doctors! The reason for asking for fixed bills)

संकेत रामनाथ खतोडे ( वय 18 , रा. राजापूर, ता. संगमनेर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यात म्हटले आहे, की त्यांची आजी सुमन मारुती खतोडे यांना 26 एप्रिल 2021 रोजी त्रास होऊ लागल्याने रॅपिड अँटीजेन व एचआरसीटी चाचणी केली असता तिला कोवीडची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिला उपचारासाठी चुलते अशोक खतोडे यांनी संगमनेर शहरातील वाणी हॉस्पिटलमध्ये 26 एप्रिल रोजी दाखल केले होते.

उपचार सुरु असतांना खतोडे यांनी त्यांना 60 हजार रुपये हॉस्पिटल व 35 हजार रुपये मेडिकलचे असे 95 हजार रुपये भरले. त्यापोटी त्यांनी मेडिकलची कच्ची पावती दिली व हॉस्पिटलचे पूर्ण बील अदा केल्यानंतर 60 हजार रुपये व उर्वरित रकमेची पक्की पावती देवू, असे सांगितले. मात्र उपचारादरम्यान 7 मे 2021 रोजी आजीचे निधन झाले. उर्वरीत रक्कम भरण्यासाठी संबंधित नातेवाईक गेले असता शासकिय योजनेसाठी त्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शन व पक्क्या बीलाची मागणी केली केली. डॉ. प्रतिक वाणी, नर्स मनिषा (पूर्ण नाव माहित नाही) व मेडीकल मधील कर्मचारी वामन (पूर्ण नाव माहित नाही) यांनी तुमची बील भरण्याची लायकी नाही, असे म्हणत, लाथाबुक्क्य़ांनी मारहाण करुन व अश्लिल शिवागाळी करुन, अपमानित करुन हॉस्पिटलबाहेर धक्के मारुन हाकलले.

या बीलाचे शासकिय नियमानुसार ऑडीट करुन येणारी रक्कम भरण्यास आम्ही तयार आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, असे प्रकार महाराष्ट्रात होऊ लागले आहेत. 
 

हेही वाचा...

नगरमध्ये आढळले 530 रुग्ण

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख