नगरमध्ये दिवसभरात वाढले 530 कोरोना रुग्ण - The town grew to 530 corona patients during the day | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये दिवसभरात वाढले 530 कोरोना रुग्ण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

जिल्ह्यात अनलाॅक झाले असले, तरी रोज वाढणारे रुग्ण पाचशेच्या वर आहेत. आज दिवसभर बाजारपेठा फुलल्या. रोज रुग्णसंख्या घटत असून, आज 530 नवीन रुग्ण आढळले.

नगर : जिल्ह्यात अनलाॅक झाले असले, तरी रोज वाढणारे रुग्ण पाचशेच्या वर आहेत. आज दिवसभर बाजारपेठा फुलल्या. रोज रुग्णसंख्या घटत असून, आज 530 नवीन कोरोना (Corona) रुग्ण आढळले. गर्दी वाढल्याने रुग्ण वाढण्याची भीती वाढली आहे. (The town grew to 530 corona patients during the day)

जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत  ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ५८ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८९ आणि अँटीजेन चाचणीत १८६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले २, जामखेड ६, नगर ग्रामीण २, पाथर्डी १, संगमनेर १०, शेवगाव २०, श्रीगोंदा १ आणि श्रीरामपूर २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ५, जामखेड २६, कर्जत १४, कोपरगाव १, नगर ग्रामिण ९,  नेवासा ३२,  पारनेर २४, पाथर्डी १७, राहाता ८, राहुरी १०, संगमनेर ३७, शेवगाव ३१, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४४, अकोले ५३, जामखेड ४९, कर्जत २५,  कोपरगाव २२, नगर ग्रामीण ५९, नेवासा ८१, पारनेर ५९, पाथर्डी ३६, राहाता ३६, राहुरी ३८, संगमनेर १३७,  शेवगाव ७८,  श्रीगोंदा ५२,  श्रीरामपूर ७०, कॅन्टोन्मेंट २, इतर जिल्हा १० आणि इतर राज्य ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २ लाख ५८ हजार ९५८ इतकी आहे. सध्या 6 हजार 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्य़ंत जिल्ह्यात तीन हजार 513 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 2 लाख 68 हजार 529 एकूण रुग्ण झाले आहेत.

 

 

हेही वाचा...

कर्डिले राष्ट्रवादीतील जावयाला मदत करणार का

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख