कोरोनाच्या काळातही आमदार लंके यांनी आणला मोठा निधी - Even during Corona's tenure, MLA Lanka brought in huge funds | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

कोरोनाच्या काळातही आमदार लंके यांनी आणला मोठा निधी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

तालुक्यातील 'क वर्ग' तिर्थक्षेत्र विकास योजनेमधून सात देवस्थानांना एक कोटी पाच लाख रूपयांचे हायमॅक्स दिवे मंजूर केले.

पारनेर : देशात व राज्यातही कोरोना (Corona) महामारीच्या संकट काळात विकास कामांवर निधी देण्यास मर्यादा आल्या आहेत. तरी सुद्धा तालुक्यातील 'क वर्ग' तिर्थक्षेत्र विकास योजनेमधून सात देवस्थानांना एक कोटी पाच लाख रूपयांचे हायमॅक्स दिवे मंजूर केले असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली. (Even during Corona's tenure, MLA Lanka brought in huge funds)

तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत तालुक्यातील सात गावांतील `क` वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या देवस्थानांसाठी सुमारे पाच लाख रूपयांचा एक या प्रमाणे तीन हायमॅक्स दिवे मंजुर करण्यात आले आहे. सात देवस्थांनासाठी हा निधी मंजूर केला आहे. कोरोनामुळे विकास निधी मंजूरीसाठी अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन आमदार लंके यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सूचना देऊन सातही गावांना प्रत्येकी तीन हायमॅक्स दिवे देण्याची सुचना केली. त्यानुसार हे हायमॅक्स मंजुर करण्यात आले आहेत. असेही लंके यांनी सांगितले.

कोरोनाच्या माहामारीत रूग्ण सेवा देत आसताना विकास कामातही दुर्लक्ष त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. "क" वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर झालेली देवस्थान पुढील प्रमाणे (प्रत्येक 15 लाख रूपयांचा निधीचे तीन हायमॅक्स) - श्री देवी अंबिका ट्रस्ट, देवीभोयरे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, वाळवणे, श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान, अपधूप, श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जतेगाव, श्री गोरेश्वर मंदिर देवस्थान, गोरेगाव, पीर शेख बहुद्दीन चिस्ती रहे दर्गाह दरोडी व शांतानंद महाराज मंदिर रायतळे, असा एकुण एक कोटी पाच लाख रूपये निधी मंजूर केला असल्याचे लंके यांनी सांगितले.

 

हेही वाचा..

सव्वा कोटी रूपयांच्या दोन बंधाऱ्यांचे लोकार्पण

पारनेर : राज्यात कोरोनाचे मोठे संकट असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठ निधी मिळविण्याचे काम लोकप्रतिनिध या नात्याने आपण करत आहोत. ते काम केवळ कर्तव्य भाननेतून आहे. सध्या विरोधकांची अवस्था अतीशय वाईट झाली आहे. किरकोळ कामासाठी प्रसिद्धी मात्र हातभर करण्याचे बालिश काम विरोधकांनी सुरू केले असल्याची टीका विरोधकांचे नांव न घेता वारणवाडी येथे विरोधकांनी केलेल्या टिकेला आमदार निलेश लंके यांनी उत्तर दिले.

चोंभूत येथील खाणीचा ओढ्यावरील 46 लाख 74 हजार रूपये व दरोडी नाला येथे 74 लाख 18 हजार रूपये खर्चाच्या बंधाऱ्याचे आमदार लंके यांच्या हस्ते लोकार्पण झाले त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी बाजार समितीचे माजी उपसभापती गंगाधर शेळके, माजी सभापती सुदाम पवार, संतोष काटे, हनुमंत भोसले, जितेश सरडे, बाळासाहेब पुंडे, ठकाराम लंके, भास्कर उचाळे, संतोष उचाळे, बंटी दाते, सोमनाथ वरखडे, संदेश कापसे, बाबाजी येवले यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

लंके म्हणाले, की कोरोना महामारीमुळे विकासकामांना निधी मिळविण्यात अडचण येत आहे. अनेक कामे रखडली आहेत, मात्र आपल्या मतदारसंघासाठी मी निधी कमी पडू देणार नाही. जिल्हयात सर्वाधिक निधी आणण्यात आपण य़शस्वी झालो आहोत.
भाळवणी येथे कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेल्या शरदचंद्र पवार कोविड सेंटर बरोबरच मतदार संघाच्या विकास कामाकडेही माझे लक्ष आहे. विरोधक काय टीका करतात याचे मला काहीच देणे घेणे नाही. गेल्या 15 वर्षात चोंभूत गावावर विकास कामा बाबत जो अन्याय झाला आहे, तो मी भरून काढणार आहे. म्हस्केवाडी येथील दोन बंधारे, एक कोटींचा रस्ता ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

 

हेही वाचा...

मुख्यमंत्र्यांमुळेच मराठा आरक्षणातील अडचणी

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख