नगराध्यक्ष अनुराधा आदिकांची बदनामी केली, भाजप पदाधिकाऱ्यावर ठोकला पाच कोटींचा दावा

राजकीय वर्तुळात येथे मुळे एकच खळबळ उडाली आहे. चित्ते यांना दाव्याबाबत काल (बुधवारी) नोटीस प्राप्त झाली असून, येथील दिवाणी न्यायालयात १४ जून रोजी हजर राहण्याचे त्यात नमूद केले आहे.
Anuradha Aadik.jpg
Anuradha Aadik.jpg

श्रीरामपूर : अपप्रचार करून बदनामी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्ष अनुराधा आदिक (Anuradha Adik) यांनी भाजपचे पदाधिकारी प्रकाश चित्ते यांच्याविरुद्ध पाच कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा येथील न्यायालयात दाखल केला आहे. (Defamed Mayor Anuradha Adik, slapped Rs 5 crore on BJP office bearer)

राजकीय वर्तुळात येथे मुळे एकच खळबळ उडाली आहे. चित्ते यांना दाव्याबाबत काल (बुधवारी) नोटीस प्राप्त झाली असून, येथील दिवाणी न्यायालयात १४ जून रोजी हजर राहण्याचे त्यात नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौक सोडून इतरत्र बसविण्याबाबत भूमिका घेतल्याचा अपप्रचार करून, तशी पोस्टर छापून बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यात नावाचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौक सोडून दुसरीकडे बसविण्याच्या घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात, तसेच शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपालिकेने हटविल्याच्या निषेधार्थ ४ एप्रिल रोजी ‘श्रीरामपूर बंद’ची हाक चित्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीच्या वतीने दिली. बदनामीसाठी खोटा मजकूर असलेल्या हँडबिलचे वाटप चित्ते यांनी स्वतः शहरात सर्वत्र केल्याचे नगराध्यक्ष आदिक यांनी दाव्यात म्हटले आहे.

हेही वाचा...

राष्ट्रवादीला उज्ज्वल भविष्य

शेवगाव :  ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला पक्ष आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे २२ वर्षांच्या कालावधीमध्ये पक्ष १७ वर्षे राज्यामध्ये सत्तेत आहे. राष्ट्रवादी पक्षास उज्ज्वल भवितव्य आहे,’’ असे प्रतिपादन ‘ज्ञानेश्वर’चे संचालक काकासाहेब नरवडे यांनी केले.

शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी नरवडे बोलत होते. राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे सभापती ॲड. अनिल मडके, संचालक संजय फडके, सचिव अविनाश म्हस्के, पंडित भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, वडुले बुद्रुकचे सरपंच प्रदीप काळे, अशोक देवढे, समीर शेख, तुफेल शेख, संतोष जाधव, वहाब शेख, गोविंद कडमिंचे आदी प्रमुख उपस्थित होते.

नरवडे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात सर्वप्रथम लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी पक्षाची पताका खांद्यावर घेतली. त्यानंतर माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी पक्ष रुजविण्याचे व वाढविण्याचे काम केले.’’
प्रास्ताविक दत्तात्रय मुटकुळे यांनी केले, तर राष्ट्रवादी सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष कृष्णा सातपुते यांनी आभार मानले.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com