शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये बांधली लग्नगाठ, आमदार लंके यांचा पुढाकार

आमदार नीलेश लंके यांच्याकडे या तरुणांनी काही दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये विवाह करावयाचा आग्रह धरला होता.
Covid center.jpg
Covid center.jpg

पारनेर : विवाह समारंभातील अनेक अनिष्ट चालिरीतींना फाटा देत दोन तरुण जोडपी चक्क कोविड (Corona) सेंटरमध्ये विवाहबद्ध झाली. इतकेच नव्हे, तर वधू-वर पित्यांनी रुखवतात भांडी, कपाट, फ्रीज, पलंग व टीव्ही यांऐवजी मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट व औषधे ठेवली. हा अनोखा सोहळा भाळवणी (ता. पारनेर) येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये पार पडला. (Sharad Chandra Pawar tied the knot at Kovid Center, MLA Lanka's initiative)

आमदार नीलेश लंके यांच्याकडे या तरुणांनी काही दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये विवाह करावयाचा आग्रह धरला होता. कोराना आजार संसर्गजन्य आहे. मात्र या आजाराविषयी जनतेत मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. कोरोनाबाधित, बरे झालेले व त्यांच्या कुटुंबीयांकडे तुच्छतेने पाहण्याची भावना वाढत आहे. समाजाचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, कोरोनाविषयी असणारी भीती दूर करण्यासाठी कोविड सेंटरमध्ये विवाह करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अनिकेत व्यवहारे व आरती शिंदे, तसेच जनार्दन कदम व राजश्री काळे या उच्चशिक्षित वधू-वरांनी सांगितले.

मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. विवाहापूर्वी वधू-वरांसह उपस्थितांची कोरोना चाचणी करण्यात आली. विवाहस्थळाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. विवाहसोहळा पार पडल्यानंतर वऱ्हाडासह रुग्णांना मिष्टान्नभोजन देण्यात आले. आहेर म्हणून कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात औषधे व इतर साहित्य भेट देण्यात आले.

या वेळी आमदार लंके यांच्यासह अॅड. राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, अशोक घुले, श्रीकांत चौरे, डॉ. सुनील गंधे, बंडू कुलकर्णी, दत्ता कोरडे, प्रमोद गोडसे, संदीप चौधरी, सत्यम निमसे, देवराम व्यवहारे, सुदाम शिंदे, रामभाऊ रासकर, लहू व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या जोडप्यांचे कौतुक

उच्चशिक्षित वधू-वरांनी सामाजिक भावनेतून कोविड सेंटरमध्ये विवाह केल्यामुळे कोरोना आजाराविषयीची भीती व गैरसमज दूर होण्यास मदत होईल. जगाला कोरोनाने हैराण केले असताना कोविड सेंटरमध्ये विवाह करण्याचा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेणाऱ्या या नववधू-वरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
- नीलेश लंके, आमदार

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com