राष्ट्रवादीचा पदाधिकारी उदयनराजेंना परस्पर भेटला.... राजकीय चर्चांना उधाण

पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारत न घेता अध्यक्षांनी उदयराजेंची भेट घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर या भेटीतून राजकीय खेळी खेळली जात असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
NCPs ZP president met Udayanraje  .... Political discussion abound
NCPs ZP president met Udayanraje .... Political discussion abound

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी आज जलमंदीर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता खासदारांची अचानक भेट घेतल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये अस्वस्थता असून त्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. NCPs ZP president met Udayanraje  .... Political discussion abound

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे सातारा, जावळी तालुक्यात मेळावे घेत आहेत. याच धामधुमीत आमदार मकरंद पाटील यांचे खंद्दे समर्थक असलेल्या उदय कबुले यांनी उदयनराजेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिरवळ गटातून अपक्ष निवडून आलेल्या श्री. कबुले यांनी माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे- पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी राजकीय ताकत पणाला लावून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कबुले यांची वर्णी लावली होती. आज विकास कामांच्या निमित्ताने उदय कबुले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारत न घेता अध्यक्षांनी उदयराजेंची भेट घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर या भेटीतून राजकीय खेळी खेळली जात असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 
.
ही भेट विकासकामांबाबत : कबुले 
खासदार उदयनराजे भोसले यांची विकासकामांबाबत भेट घेतली आहे. अनेक शासकीय इमारती ह्या हेरिटेजमध्ये येत असल्याने त्यांची दुरुस्ती करता येत नाही. त्या अनुषंगाने उदयनराजेंची भेट घेवून चर्चा केली. या भेटीमागे कसलेही राजकारण नसल्याचे प्रतिक्रिया अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com