शरद पवार काँग्रेसच्या पडक्या हवेलीत कधीच जाणार नाहीत! 

ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने पुरावे सादर‌ करावेत
 Sharad Pawar, Raosaheb Danve .jpg
Sharad Pawar, Raosaheb Danve .jpg

नवी दिल्ली : काँग्रेसची अवस्था ही नादुरुस्त हवेलीसारखी झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. पवार यांनी काँग्रेसवर केलली टीका अचूक आहे. कारण ते त्या घरात राहिले आहेत. त्या घराचे कोणते खांब ढासाळले, याची त्यांना चांगली माहिती आहे, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पवारांच्या टिकेचे समर्थन केले. ते इमारतीला बाहेरून टेकू देत आहेत. ते काँग्रेसच्या त्या पडक्या हवेलीत कधीच जाणार नाहीत, असे मतही दानवे यांनी व्यक्त केले. (Raosahe Danve said Sharad Pawar's criticism of Congress is correct) 

त्यामुळे पवार किती टोकदार बोलले, तर सरकार पडणार नाही. त्यांचा उद्देश साध्य झाला की ते सरकार असे‌ पडेल की त्यांनाच कळणार नाही. पवारांची टीका ही सत्य आहे. आता त्यांना काँग्रेस परत बोलवत आहे. पण पवार त्या पडक्या घरात जाणार नाहीत, असेही दानवे म्हणाले.  

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. याबाबत ते म्हणाले, "राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. या सरकारने वकिलांची फौज न्यायालयात उभी करायला पाहिजे होती. पण ते या सगळ्याचे खापर केंद्रावर फोडत राहिले. आता हा धंदा त्यांनी बंद करावा. केवळ मोर्चे काढून आणि स्वत:ला ओबीसी नेता असल्याचे मिरवत आरक्षण मिळणार नाही. ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने पुरावे सादर‌ करावेत, केवळ समाजासमोर चमकू नये, असा सल्ला दानवे यांनी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिला. भाजप ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार देणार, असे दानवे यांनी सांगितले. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विषयी बोलताना दानवे म्हणाले, अनिल देशमुख कुठे गायब आहेत. कुठे आहेत ते राज्याचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. रेल्वेमध्ये जेवण आणि चादरी देणे बंद आहे, या विषयी विचारले असता दानवे म्हणाले, कोरोना काळात चादरी जेवण बंद केले. राज्य सरकाने परवानगी  दिली तर सुरु करु, असेही त्यांनी सांगितले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com