साडे सहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी खेडचा ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

ग्रामविकास अधिकारी गायकवाड याने संबंधित पोट ठेकेदाराकडे तीन टक्कयाप्रमाणे साडेसात हजारांची मागणी लाच स्‍वरुपात केली होती.याबाबत पोटठेकेदाराने गायकवाड यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतर त्‍याने साडेसहा हजार रुपये घेण्‍यास मान्‍यता दर्शवली. त्यानंतर याबाबतची तक्रार त्‍या पोटठेकेदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली.
साडे सहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी खेडचा ग्रामविकास अधिकारी जाळ्यात
Khed's village development officer caught taking bribe

सातारा : रस्त्याच्‍या कामाचे बिल काढण्‍यासाठी तडजोडीअंती साडे सहा हजार रूपयांची लाच स्‍वीकारल्‍याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खेड (सातारा) येथील ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्‍‍वर दगडू गायकवाड (वय ४८) याला आज अटक केली. Khed's village development officer caught taking bribe 

खेड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्‍हणून ज्ञानेश्‍‍वर गायकवाड हे कार्यरत होते. या ग्रामपंचायतीच्‍या हद्दीत एका रस्‍त्‍याचे काम करायचे होते. हे काम एका ठेकेदाराने पोटठेकेदारास दिले. या कामापोटी संबंधित पोट ठेकेदाराचे साडेतीन लाखांचे बिल मंजूर करुन त्‍याचा धनादेश ग्रामपंचायतीच्‍या वतीने त्‍याला देण्‍यात आला होता.

या मोबदल्‍यात ग्रामविकास अधिकारी गायकवाड याने संबंधित पोट ठेकेदाराकडे तीन टक्कयाप्रमाणे साडेसात हजारांची मागणी लाच स्‍वरुपात केली होती. याबाबत पोटठेकेदाराने गायकवाड यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतर त्‍याने साडेसहा हजार रुपये घेण्‍यास मान्‍यता दर्शवली. त्यानंतर याबाबतची तक्रार त्‍या पोटठेकेदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली.

यानुसार त्‍याची पडताळणी करण्‍यात आली. पडताळणीनंतर गायकवाड याला साडेसहा हजारांची लाच स्‍वीकारल्‍यानंतर रंगेहाथ पकडण्‍यात आले. या कारवाईत उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक आरिफा मुल्‍ला व कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रकरणी गायकवाड याच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्‍यात सुरु होती. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in