राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा...

सरकारमध्ये भांडणे सुरू असून, ते कधीही कोसळू शकते. त्यामुळे कॉंग्रेसला योग्य संधी आहे.
Nana Patole-rahul Gandhi News Aurangabad
Nana Patole-rahul Gandhi News Aurangabad

औरंगाबादः मराठवाड्यात कॉंग्रेस मजबूत आहे पण नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. यापुढे आघाडीच नसल्याने मॅच फिक्सिंगही चालणार नाही. तुम्ही दिसाल तर फक्त कॉंग्रेस पदाधिकाऱ्यासोबतच. चुका केल्यास माफी मिळणार नाही, तक्रार आली तर माहिती घेतली जाईल, त्यानंतर थेट कारवाई होईल. (Work to make Rahul Gandhi the Prime Minister.) कोण मोठा कोण लहान हे पाहिले जाणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आगामी काळात काॅंग्रेसला संधी आहे, तेव्हा राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमांतर्ग स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा काॅंग्रेसच्या वतीने घेण्यात आला. (Congress State President Nana Patole) यावेळी पटोले यांनी केंद्रावर टीका करतांनाच पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनाही खडसावले. पक्षाची ताकद असूनही नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने नुकसान होत असल्याचे सांगत यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असेही त्यांनी निक्षूण सांगितले.

पटोले म्हणाले, या पुढे तिकीट वाटपात ६० टक्के उमेदवार नवे असतील तर ४० टक्के जुन्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  मी मराठवाड्याचा सर्व्हे केला असता, मराठावाड्यात कॉंग्रेसची मोठी ताकद आहे, पण नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी काळात फक्त नेत्यांनी समन्वय ठेवण्याचे काम करावे. आगामी काळात मराठवाड्यात बैठका घेतल्या जातील.

केंद्रातील सरकार जाती-जातीमध्ये भेद निर्माण करून भांडणे लावण्याचे काम करत आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. दुसरीकडे विकास दर मायनसमध्ये आहे. त्यामुळे सरकारमध्ये भांडणे सुरू असून, ते कधीही कोसळू शकते. त्यामुळे कॉंग्रेसला योग्य संधी आहे. पुढील पंतप्रधान राहुल गांधीच होतील यासाठी ग्राऊंडवर जाऊन काम करा, असा सल्ला पटोले यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in