अजित पवारांचा उस्मानाबाद दौरा राहुल मोटेंचे हात बळकट करण्यासाठी?

अजित पवारांचा हा शासकीय दौरा असला तरी त्यातून बरेच राजकीय डाव खेळले जाणार एवढे मात्र निश्चित.
deputy chief Minister Ajit Pawar  Osmanabad Tour news
deputy chief Minister Ajit Pawar Osmanabad Tour news

उस्मानाबाद ः गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅंग्रेसला लागलेल्या गळतीचा सर्वाधिक फटका उस्मानाबादमध्ये बसला होता. अनेक वर्ष मंत्रीपद उपभोगलेले नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा उस्मानाबाद जिल्हा ढासळला. (Will Ajit Pawar's Osmanabad tour revive the NCP?)) आता या ढासळलेल्या बालेकिल्याची नव्याने तटबंदी मजबुत करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सरसावले आहेत.

मध्यंतरीचा खाजगी दौरा सोडला तर राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येऊन अजित पवार उपुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच उस्मानाबाद दौरा आहे. त्यामुळे याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar) गेल्या दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांची धावपळ सुरू होती. भाजपकडून सरकार पाडण्याचे सुरू असलेले प्रयत्न, त्यातच ओढावलेले कोरोनाचे संकट यामुळे अजित पवार बाहेर पडू शकले नव्हते.

त्यातच कोरोनाने देखील त्यांना गाठले होते. परंतु राष्ट्रवादी काॅंग्रेसचा २२ वा वर्धापनदिन नुकताच मुंबईत साजरा झाला आणि त्यानंतर अजित  पवारांनी मराठावाड्याचा दौरा सुरू केला. (Ex.Mla Rahul Mote) अर्थात या दौऱ्याची सुरूवात त्यांनी बीड आणि उस्मानाबादपासून केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी राज्यातील सत्तेमुळे अधिक भक्कम झाली आहे, तर उस्मानाबादमध्ये पक्षाला पुन्हा उभारी घ्यायची आहे. (Bjp Mla Rana Jagjeetsinh Patil) अजित पवारांचा हा शासकीय दौरा असला तरी त्यातून बरेच राजकीय डाव खेळले जाणार एवढे मात्र निश्चित.

कधीकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा समजले जाणारे राणाजगतीसिंह पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आले. घड्याळ चिन्हावर निवडून आलेले अनेक नगरसेवक व पदाधिकारी देखील राणापाटील यांचाच शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे माजी आमदार राहुल मोटे यांचे प्रयत्न तोकडे पडतात.

मोटेंना दिला एक तासाचा वेळ..

अजित पवार यांच्या उद्याच्या दौऱ्यात मोटे यांना बळ देऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नव्याने बांधणीची रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात अजित पवारांनी  राहुल मोटे यांच्याकडे खास वेळ राखीव ठेवला आहे.  यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे देखील असणार आहेत, असे बोलले जाते.  गेल्या काही काळापासुन राहुल मोटे हे फारसे दिसत नव्हते, पण नेत्यांच्या येण्याने त्यांना बळ मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांतुन व्यक्त होत आहे. 

अजित पवार व राहुल मोटे यांच्यामध्ये जवळचे नातेही आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासुन  पवार यांचा उस्मानाबादला हा पहिलाच शासकीय दौरा आहे. मध्यंतरी त्यांचे मेव्हणे व सुनेत्रा पवार यांचे बंधु अमर पाटील यांच्या निधनावेळी त्यानी तेर येथे हजेरी लावली होती. या घरगुती दौऱ्यानंतर ते जिल्ह्यात आलेले नाहीत. या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील कोरोना परिस्थीतीचा आणि जिल्हा खरीप हंगामाचा आढावा देखील ते घेणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com