अमरसिंहांचाही लवकरच सन्मान करु; धनंजय मुंडेंच्या संकेताने समर्थकांच्या आशा पल्लवित - We will soon honor Amar Singh too; Dhananjay Munde's gesture raises hopes of supporters | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

अमरसिंहांचाही लवकरच सन्मान करु; धनंजय मुंडेंच्या संकेताने समर्थकांच्या आशा पल्लवित

वैजीनाथ जाधव
रविवार, 13 जून 2021

लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करणाऱ्या अमरसिंह पंडित यांचाही लवकरच सन्मान होईल. परंतु, हा सन्मान कोरोनाच्या निमित्ताने नाही तर वेगळ्या कारणांनी होईल, असे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

गेवराई : कोरोनाने माणूसकी हिरावली. परंतु, दुसऱ्या लाटेत कोविड योद्ध्यांमुळे माणूसकी जिवंत राहीली. त्यांच्या कार्याला सलाम आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सीजन उपलब्ध करणाऱ्या अमरसिंह पंडित यांचाही सन्मान करण्यासाठी लवकरच परत येऊ. (We will soon honor Amar Singh too; Dhananjay Munde's gesture raises hopes of supporters) पण, हा सन्मान कोरोनाच्या कारणांनी नाही तर इतर कारणांनी असेल, असेही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाल्याने पंडित समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी कोविड योध्दा सन्मान व तालुक्यात संत भगवानबाबा वसतीगृह मंजूर केल्याबद्दल धनंजय मुंडे यांचा नागरी सत्कार झाला. (Minister Dhnanjay Munde) आमदार सतिष चव्हाण, बाळासाहेब आजबे, संजय दौंड, आदींची यावेळी उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे महत्वाचे व जबाबदार नेते असलेले धनंजय मुंडे यांनी इतर प्रमुख नेत्यांसमक्ष केलेल्या या वक्तव्याने लवकरच पंडित यांना काहीतरी महत्वाची आणि संविधानिक जबाबदारी मिळणार असे संकेत मिळत आहेत.

जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या अमरसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्य ते गेवराई विधानसभेचे आमदार आणि एकदा वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून अमरसिंह पंडित यांनी काम केलेले आहे. (Ncp Leadr Amarsinh Pandit) आक्रमक वक्तृत्वाबरोबरच राजकीय डावपेचांतही ते माहिर आहेत. त्यांच्या डावपेचांमुळेच जिल्हा बँकेवरील अनेक वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे.

शेती, सहकाराचा अभ्यास असल्याने जेष्ठ नेते शरद पवारांच्याही  पंडित गुड बुकमध्ये आहेत. त्यांच्याकडे सध्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा असली तरी नव्या सत्तासमिकरणांत त्यांना संविधानिक पद अद्याप मिळालेले नाही. आता मुंडेंनी संकेत दिल्याने लवकरच काही घडेल, असा आशावाद पंडित समर्थकांमध्ये आहे.

हे ही वाचा ः इंधन दरवाढीवर पेट्रोलियम मंत्री म्हणतात, आम्ही पैशांची बचत करतोय..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख