पालकमंत्र्यांकडून चंद्रकांत खैरे यांचे कौतुक; विरोधकांच्या भुवया उंचावल्या..

तुमच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे गरजेचे असले तरी, खैरे यांना तो मान द्या, असे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगतिल्याचा विशेष उल्लेख देसाई यांनी यावेळी केला.
gardiaun minister Subhash Desai- Chandrakant Khaire Aurangabad News
gardiaun minister Subhash Desai- Chandrakant Khaire Aurangabad News

औरंगाबाद ः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे खासदार असतांना त्यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या लोहपूरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. देसाई यांनी आपल्या भाषणात खैरे यांचे कौतुक करत त्यांनी या पुतळ्यासाठी दिलेल्या ४० लाख रुपयांच्या निधीचा आवर्जून उल्लेख केला. (Unveiling of the statue of Vallabhbhai; Khaire's appreciation from the Guardian Minister raised the eyebrows of the opposition.) एवढेच नाही तर या पुतळ्याचे अनावरण चंद्रकांत खैरे यांच्याच हस्ते करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला केली असल्याचेही सांगितले.

देसाई यांच्याकडून जाहीरपणे असे कौतुक झाल्यामुळे खैरे विरोधकांच्या मात्र भुवया उंचावल्या होत्या.(Gardiuan Minister Subhash Desai) शहरातील शहागंज या मध्यवर्ती भागातील चमन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे रुपांतर पुर्णाकृतीमध्ये करण्यात आले. (Shivsena Leader Chandrakant Khaire) हा पुतळा तयार होता, परंतु त्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावे, अशी खैरे यांच्यासह अनेक शिवसैनिकांची इच्छा होती.

पण कोरोना काळात मी येऊन गर्दी जमवणे योग्य होणार नाही, पालकमंत्री म्हणून तुमच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे गरजेचे असले तरी, खैरे यांना तो मान द्या, असे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगतिल्याचा विशेष उल्लेख देसाई यांनी यावेळी केला. त्याला हात जोडत खैरे यांनी देखील कृतज्ञता व्यक्त केली. देसाई यांच्या अशा जाहीर कौतुकाची कार्यक्रमस्थळी चांगली चर्चा होती.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेतील गटबाजीला चांगले उधाण आले होते. खैरे यांना डावलून संघटनात्मक निर्णय घेतले जात असल्याचे बोलले जात होते. जिल्हा बॅंक निवडणूकीत तर ते प्रामुख्याने दिसूनही आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत आलेले आणि सत्ता आल्यानंतर राज्यमंत्री झालेले अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील शिवसेनेची सुत्रे आपल्या हाती घेण्याचे प्रयत्न सुरु केले.

रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तार यांनी हा प्रयोग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यशस्वी करून दाखवला. विशेष म्हणजे खैरे यांना दूर ठेवत, पालकमंत्र्यांची संमती देखील त्यावेळी मिळवण्यात  या त्रिकुटाला यश आले होते. त्यामुळे खैरे विरुद्ध इतर सगळे असे काहीसे चित्र जिल्ह्यातील शिवसेनेत निर्माण झाले.

खैरे यांचे आता मातोश्री आणि मुंबईत वजन राहिले नाही, अशा चर्चा देखील अधूनमधून होत असतात. अशावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चंद्रकांत खैरे यांचे महत्व अधोरेखित करणारे विधान जाहीरपणे केल्याने अनेकांना आश्चर्यांचा धक्का बसला. देसाई यांच्या या कौतुकाचे अनेक अर्थ काढले जात असले तरी खैरेच्या समर्थकांना ही सुखावणारी गोष्ट म्हणावी लागेल.

सुभाष देसाई म्हणाले, लोकप्रतिनिधी सहसा आपला विकास निधी हा लोकोपयोगी कामांवर खर्च करतात, यासाठी त्यांच्यात स्पर्धा असते. पण खैरे यांनी आपला खासदार निधी थोडाथिडका नाही तर तब्बल ४० लक्ष रुपये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी दिला. केवळ निधी दिला म्हणून नाही तर सरदार पटेल यांच्याबद्दल आदर आणि देशभक्तीच्या भावनेतून त्यांनी हे केले.

या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे, अशी माझ्यासह सगळ्यांची इच्छा होती. मी जेव्हा त्यांची तारीख घ्यायला गेलो, तेव्हा त्यांनी माझ्याकडून या पुतळ्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली. एक खास सूचना मला त्यांनी केली आणि वल्लभभाईंच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मान खैरेंना द्या, असे सांगितले. खैरे यांनी निधी उपलब्ध् करून दिला, त्यामुळे शहराच्या मध्यभागी वल्लभभाईंचा हा पुर्णाकृती पुतळा उभा राहू शकला, असेही देसाई म्हणाले.

खैरे यांच्यावर अचानक झालेला हा कौतुकाचा वर्षाव सगळ्यांनाच धक्का देणारा होता. आपल्याला डावलले जात असल्यामुळे नाराज असलेल्या खैरेंना गोंजारण्याचा हा पालकमंत्र्यांचा प्रयत्न होता का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खैरे यांच्या सारख्या एकनिष्ठ आणि प्रामाणिक नेत्याला दुखावणे परवडणारे नाही, म्हणून त्यांना पुन्हा मानाचे पान देण्याचे संकेत या निमित्ताने मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचेही बोलले जाते. 

सर्व पक्षीय नेते व्यासपीठावर..

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यापुर्वी शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शुभारंभ झाले. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काॅंग्रेसला डावलले गेल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

आज मात्र काॅंग्रेसची ही नाराजी दूर करण्यात आल्याचे दिसून आले. व्यासपीठावर भाजपचे आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे, यांच्यासह काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांना देखील स्थान देण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे यापुढे आता काॅंग्रेसचे नेतेही यापुढील कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com