केंद्रातील भाजप सरकारचा `सहकार` संपवण्याचा प्रयत्न 

गोरगरीब, खेड्यातील सामान्य माणूस, शहरातील माणसं व मध्यमवर्गीय एकत्र येऊन अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंका चालवतात. त्या बॅंकांवर निर्बंध आणणे हे चुकीचे आहे. रिझर्व्ह बॅंकेचे हे धोरण निषेधार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सहकार क्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.
Jayant Patil
Jayant Patil

नांदेड : गोरगरीब, खेड्यातील सामान्य माणूस, शहरातील माणसं व मध्यमवर्गीय एकत्र येऊन अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंका चालवतात. (Middle class people runs cooperative banks succesfully) त्या बॅंकांवर निर्बंध आणणे हे चुकीचे आहे. रिझर्व्ह बॅंकेचे हे धोरण निषेधार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सहकार क्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे, (BJP wants to finish Cooperative) असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. 

सहकार क्षेत्रातील बॅंकांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, श्री. पाटील यांनी या धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला. 

सीबीआय, ईडीनंतर आता रिझर्व्ह बॅंकेचा दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता 'आता तुम्हीच समजून जा' असा सूचक इशाराही केला. 

ते म्हणाले, खाजगी बॅंका सामान्य लोकांना दारात उभ्या करत नव्हत्या. असं लक्षात आल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले. सहकार म्हणजे सामान्य लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली शक्ती. त्या शक्तीतून अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. परंतु भाजपला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सहकार मोडून काढायचा आहे. मोदीसाहेबांशिवाय कुणी काही काम केलेच नाही पाहिजे, अशी भावना भाजपची आहे.

लोकप्रतिनिधींनी चुका केल्यानंतर रिझर्व्ह बॅंक किंवा नाबार्डकडे कंट्रोल असायला हवा अशी मागणी आहे. परंतु नाबार्डचा कंट्रोल जाऊन रिझर्व्ह बॅंकेने कंट्रोल घेतला आहे. आता रिझर्व्ह बॅंकेने सगळ्या संचालक मंडळावर आणखी एक सल्लागार मंडळ नेमावे, असे आदेश दिल्याचे सांगतानाच एवढे नियंत्रण केल्यावर आपली अर्थव्यवस्थेची वाढ कशी होणार आहे?. अर्थव्यवस्था वाढवायची असेल, तर तर मुक्त व लवचीक विचार हवेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com