उदय माझ्या मुलासारखा, त्याने राजकारणात अजून मोठं व्हावं..

पुर्वी उदय सामंत आणि सुर्यकांता पाटील हे एकाच पक्षात असल्यामुळे त्यांच्यात जुणे ऋणानूबंध आहेत.
उदय माझ्या मुलासारखा, त्याने राजकारणात अजून मोठं व्हावं..
Minister Udya Samant vist Suryakanta Patil House in Nanded News

नांदेड ः उदय माझ्या मुलासारखा आहे, त्याने राजकारणात अजून खूप मोठं व्हावं, अशा शब्दांत भाजप नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना सदिच्छा दिल्या. (Uday, like my son, he should grow up in politics.) सामंत हे आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विविध कार्यक्रमानिमित्त नांदेड दौऱ्यावर होते. नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

पुर्वी उदय सामंत आणि सुर्यकांता पाटील हे एकाच पक्षात असल्यामुळे त्यांच्यात जुणे ऋणानूबंध आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Bjp Leader Suryakanta Patil Nanded) उदय सामंत सध्या शिवसेनेत व महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत, तर सुर्यकांता पाटील या भाजपच्या नेत्या आहेत. सध्याचे शिवसेना-भाजप यांच्यातील तणावाचे संबंध पाहता नांदेड मध्ये झालेल्या या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असली तरी ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगितले जाते.

उदय सामंत सुर्यकांता पाटील यांच्या निवासस्थानी पोहचल्यावर त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. ( Higher Education Minister Udya Samant, Maharashtra) पाटील यांनी सामंत यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत राज्यातील राजकीय विषयावर देखील चर्चा केली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून तुझे काम चांगले आहे, अशी शाबासकी देखील सुर्यकांता पाटील यांनी यावेळी दिली. उदय माझ्या मुलासारखा आहे, त्याने राजकारणात आणखी मोठं व्हावं, प्रगती करावी अशा, सदिच्छा आणि आशिर्वाद देखील सुर्यकांता पाटील यांनी सामंत यांना यावेळी दिले.

उद्धव नाव असलेल्या व्यक्तीच धाडस करू शकतात

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोविड लॅब ही देशातील आदर्श लॅब झाली आहे. हे धाडस उद्धव नाव असणाऱ्या व्यक्ती करू शकतात मग ते राज्याचे नेतृत्व असो की विद्यापीठाचे नेतृत्व असे म्हणत स्वतःची जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आनंद होत असल्याची भावना उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कोविड योद्धांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in