उद्धव नाव असलेल्या व्यक्ती धाडसीच असतात; सामंतांकडून कुलगुरूंचे कौतुक..

कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात व शेवट हा राष्ट्रगीताने झाली पाहिजे असा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचेही सामंत म्हणाले.
Minister Udya Samant in Nanded Universcity News
Minister Udya Samant in Nanded Universcity News

नवीन नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोविड लॅब ही देशातील आदर्श लॅब झाली आहे. हे धाडस उद्धव नाव असणाऱ्या व्यक्ती करू शकतात मग ते राज्याचे नेतृत्व असो, की विद्यापीठाचे नेतृत्व असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरू डाॅ.उध्दव भोसले यांचे कौतुक केले. (People with the name Uddhav are brave; Appreciation of the Vice-Chancellor from Higher Education Minister) स्वतःच्या जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कोविड योद्धांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. (Swami Ramanand Tirth Marathwada Univercity, Nanded) यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, आमदार मोहन हंबर्डे,आमदार बालाजी कल्याणकर, प्र. कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, उच्च शिक्षण सह संचालक डॉ. विठल मोरे,कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे,रासेयो संचालक डॉ.शिवराज बोकडे उपस्थित होते.

ज्यांच्या अंगी पालकांनी आपल्या मुलांना संस्कार दिले त्या संस्कारक्षम विद्यार्थ्यांचे कौतुक झालेच पाहिजे. नव्या पिढीसमोर कोरोना योद्धाचा आदर्श ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करणे महत्वाचे आहे. ( Uday Samant, Higher Education Minister, Maharashtra) कोरोना होऊ नये म्हणून घराच्या बाहेर न पडणारी माणसे होती, अशावेळी याच कोरोना योध्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिली. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप महत्वाची आहे.

यामुळे अन्य विद्यार्थी या प्रवाहात सामील होतील. यासाठी मी राज्यभर दौरा करणार असून याची सुरुवात स्वारातिम विद्यापीठातून करत आहे. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात व शेवट हा राष्ट्रगीताने झाली पाहिजे असा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचेही सामंत म्हणाले.  प्रत्येक महाविद्यालयातून शिवज्योत रॅली काढण्याचा आणि शिवराज्य दिवस साजरा करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यातून छत्रपती शिवरायांचा संदेश राज्यभर पोहोचवला जाईल असे माझे मत आहे. नांदेड विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अधिवेशन केंद्र लवकरात लवकर सुरू होईल, शिवाय एनसीसीचे युनिट हि विद्यापीठात सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचा अधिकाधिक विकास व्हावा यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही सामंत यांनी यावेळी दिले. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com