..त्यांनी आणखी एक इतिहास रचला; पेट्रोलच्या शंभरीवरून एमआयएमचा मोदींना टोला

मोदी है तो मुमकीन है असे ट्विट करत इम्तियाज यांनी पेट्रोल दरवाढीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
Mp Imtiaz Jalil- PM Modi-Petrol price News Aurangabad
Mp Imtiaz Jalil- PM Modi-Petrol price News Aurangabad

औरंगाबाद ः देशात व राज्यात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे, गेल्या महिनाभरात पेट्रोलच्या दरवाढीचे चटके सर्वसामान्यांना बसत आहेत. या भरमसाठ पेट्रोल दरवाढीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रातील मोदील सरकारला टोा लगावला आहे. (..They made another history; MIM's toll on Modi from 100 petrol) मोदी है तो मुमकीन है असे ट्विट करत इम्तियाज यांनी पेट्रोल दरवाढीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आणखी एक इतिहास रचला अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकार व मोदी भक्तांना डिवचले.

देशात व राज्यात कोरोना महामारीचे संकट अधिक तीव्र होत आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेत लोखो लोकांचे प्राण घेतल्यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जाते. (Strict restrictions have been imposed in Maharashtra since last month.) देश विशेषतः महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतुक सगळेच बंद आहेत.

सर्वसामान्यांचे जगणे कठीण झालेले असतांना त्यांना दिलासा देण्याऐवजी सातत्याने पेट्रोलच्या किंमतीत वाढ करून केंद्र सरकार जखमेवर मीठ चोळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडली आहे.(In most of the cities in the state, petrol is being sold for more than a hundred rupees.) राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल शंभर रुपयांपेक्षा अधिक भावाने विकले जात आहे.

या भाववाढीचा दाखला देत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल दरवाढीवरून त्यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारला चिमटा काढला आहे. (MP Imtiaz Jalil has once again targeted the Modi government.) ` त्यांनी आणखी एक इतिहास रचला`, अशा शब्दांत त्यांनी मोदी समर्थकांवर देखील टीका केली.

मोदी है तो मुमकीन है म्हणारे मोदी भक्त आता देखील म्हणतील, (Modi devotees who say Modi is possible will still say) की बघा जे देशाच्या इतिहासात आतापर्यंत कुणी केले नाही, ते आमच्या मोदींजीनी करून दाखवले, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी मोदी समर्थकांची टिंगल उडवली.

Edited By : Jagdish Pansare
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com