शिवसेना आमदार दानवे, राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांची शिरखुर्मा डिप्लोमसी..

कदीर मौलाना हे दोनवेळा विधानसभा निवडणुक लढलेले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांच्याशी देखील त्यांची जवळीक आहे.
Shivsena Mla Ambadas Danve- Ncp Leader Kadir Maulan News Aurangabad
Shivsena Mla Ambadas Danve- Ncp Leader Kadir Maulan News Aurangabad

औरंगाबाद ः प्रखर हिंदुत्ववादासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेने राज्यातील सत्तेसाठी आपल्या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेतले. अशक्य वाटणारी तीन विरुद्ध पक्षांची युती होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. (Political parties in the city are seen hugging each other.) या आघाडीचा स्थानिक पातळीवर देखील परिणाम होतांना दिसतो आहे. ज्या नेत्यांनी कधी एकमेकांचे तोंड देखील पहायले नाही, असे शहरातील राजकीय मंडळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतांना दिसत आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. (Shiv Sena MLA Danve, NCP's Kadir Maulana's Shirkhurma diplomacy ) नुकतीच रमाझान ईद झाल्यामुळे ते मौलाना यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते असे बोलले जाते. यावेळी दानवे आणि मौलाना सोबत शिरखुर्म्याचा अस्वाद घेतांनाही दिसले. महाविकास आघाडीतील या दोन स्थानिक नेत्यांची ही शिरखुर्मा डिप्लोमसी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  

शहर व जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचे वजन वाढल्याचे बोलले जाते. स्थानिक पातळीवरील संघटनेचे महत्वाचे निर्णय आता तेच घेतात. नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीत देखील त्यांची भूमिका महत्वाची ठरली होती. (As Danve is getting strength from senior leaders in Mumbai, his car is now in good shape.) जिल्हाप्रमुख, विधान परिषदेवर आमदार आणि आता जिल्हा बॅंकेचे संचालक होत दानवे यांनी सहकार क्षेत्रातही प्रवेश केला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासोबत असलेल्या मतभेदानंतरही मुंबईतील वरिष्ठ नेत्यांकडून दानवे यांना बळ मिळत असल्याने त्यांची गाडी सध्या सुसाट आहे.

जालना- औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दानवे यांना शिवसेनेचा कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयएमसह सर्वच पक्षांची मदत झील होती. त्यामुळे ते सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले होते. कोरोनामुळे लांबलेल्या महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन दानवे यांनी तयारी सुरू केली आहे.

राज्याच्या सत्तेत महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काॅग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी दानवे यांनी संपर्क सुरू केला आहे. (Danve has been in touch with local NCP leaders.) महाविकास आघाडीमुळे येणाऱ्या महापालिका व इतर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत शिवसेनेला काही फायदा होऊ शकतो का? याची चाचपणी शिवसेनेने सुरू केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व शहरातील अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते कदीर मौलाना यांनी दानवे यांनी त्यांच्या घरी जाऊन नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

भेटीबाबत दानवेंकडून गुप्तता..

कदीर मौलाना हे दोनवेळा विधानसभा निवडणुक लढलेले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांच्याशी देखील त्यांची जवळीक आहे. (Qadir Maulana has contested Assembly elections twice.) शिवाय महापालिका निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका असते. विशेष म्हणजे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे कट्टर विरोधक अशी देखील त्यांची ओळख आहे. तर अशा या कदीर मौलाना यांची त्याच्या घरी जाऊन अंबादास दानवे यांनी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रमझानच्या शुभेच्छा आणि शिरखुर्म्याचा अस्वाद घेणे एवढ्यापुरते या भेटीकडे नक्कीच पाहता येणार नाही. (This visit is definitely considered important in the backdrop of municipal elections.) या भेटीत या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकले नसले, तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट नक्कीच महत्वाची मानली जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com