सुसाईड नोट व्हाट्सअ‍ॅप करून पोलिस कर्मचारी बेपत्ता; फोनही बंद .. - Suicide note disappears by police personnel; Phone off | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

सुसाईड नोट व्हाट्सअ‍ॅप करून पोलिस कर्मचारी बेपत्ता; फोनही बंद ..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जुलै 2021

जालना जिल्ह्यातील सेवली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या उखळी गावात गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती.

जालना ः वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची पोस्ट व्हाॅट्सअॅपवर टाकून नंतर फोन बंद करून एक पोलिस कर्मचारी गायब झाल्याची घटना समोर आली आहे. (Suicide note disappears by police personnel; Phone off ) सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याने फोनही बंद करून टाकल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या कर्मचाऱ्याचा कसून शोध घेत आहेत.

जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता  झाला, पण बेपत्ता होण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ती  व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केली. ( Jalna Police) त्यानंतर मात्र आपला फोन बंद करुन तो बेपत्ता झाला आहे.

या नोटमध्ये त्याने  आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.  या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जालना जिल्ह्यातील सेवली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या उखळी गावात गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती.  ही कारवाई एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची माहिती कोणी तरी दिली होती.

शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप..

त्यामुळे आरोपी आणि त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली.  इतकेच नाही तर त्याला धमकी सुद्धा दिली होती.

यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने  हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जाते. आपण प्रभारी अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहून ती पोस्ट पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केली.  त्यानंतर दुपारपासून मोबाइल बंद करून हा पोलीस कर्मचारी गायब झाला आहे.

आपल्या मृत्यूस संबंधित प्रभारी पोलिस अधिकारी,  व आपल्या विरोधात तक्रार करणारे पती-पत्नी जबादार राहणार असून, त्याची सर्व माहिती माझ्या पत्नीस द्यावी, असेही या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

हे ही वाचा ः कंत्राटी क्रिडा शिक्षकांना सेवेत कायम करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख