कंत्राटी क्रीडा शिक्षकांना सेवेत कायम करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी..  - Maintain contract sports teachers in service, demand to CM .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कंत्राटी क्रीडा शिक्षकांना सेवेत कायम करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जुलै 2021

प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत क्रिडा शिक्षक नियमित पद मंजूर होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने एक क्रिडा शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी.

औरंगाबाद : आदिवासी विकास विभागातील क्रीडा मानधन शिक्षकांना २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी नेमणुक करण्यात यावी, तसेच कंत्राटी क्रीडा शिक्षकांना सेवेत कायम करावे, (Maintain contract sports teachers in service, demand to CM) अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदिवासी मंत्री के.सी पाडवी यांच्यांकडे पत्रद्वारे केली आहे. 

आदिवासी विकास विभागामार्फत गेल्या तीन वर्षापासुन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिक्षकांची मानधनावर नेमणुक करण्यात आली होती. मात्र २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने सदर कर्मचा-यांना मागील वर्षी आदेश निर्गमित करण्यात आले नाही. (Shivsena Mla Sanjay Sirsath Letter to Cm Uddhav Thackeray) परिणामी, राज्यभरातील पाचशेहून अधिक मानधन कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. 

त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.  त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानूभूतीपूर्वक विचार करुन चालु सत्रापासून त्यांना मानधनावर त्वरीत नियुक्ती आदेश मिळावेत, असे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Sport Teacher) अनलॉक लर्निंग १, ऑनलाईन अध्यापन तसेच कोरोना काळातील विद्यार्थ्यांचा योगा, व्यायाम व सोशल डिस्टन्सिंचे पालन करुन त्यांचे आरोग्य सुदृढ राहिल, याबाबत क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना गावपाड्यावर जाऊन शिकवण्यास तयार आहेत.

यामधील शिक्षक सर्व प्रकारच्या जबाबदा-या सक्षमपणे निभावु शकतील. कोविडमुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ३० एप्रिल २०२० पर्यंत सदरील मानधन शिक्षकांचे आदेश असताना क्रीडा शिक्षकांचे वेतन (पेन, जव्हार, यावल, औरंगाबाद, चंद्रपुर) यांसारखे प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांत सदरील कर्मचा-यांचे एप्रिल २०२० पर्यंतचे मानधन अदा करण्यात आलेले नाही.

प्रत्येक आश्रमशाळेत क्रिडा शिक्षक नेमा..

केंद्र व राज्य शासनाचे आदेश असतानाही सदर कर्मचा-यांना वेतनापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. तरी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व विकासाचा विचार करुन सर्व कंत्राटी शिक्षकांना आदेश निर्गमीत करुन न्याय द्यावा.   
तसेच, आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्या खालील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील बहुतांश विद्यार्थी अनेक कलागुण व खेळांत प्रविण आहेत.

परंतु सदर शाळेत क्रिडा शिक्षक, मार्गदर्शकाचे पद मंजूर नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना बदलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळातील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख खेळांची शास्त्रोक्त माहिती आदी बाबींपासून वंचित राहावे लागत आहेत, परिणामी, प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत क्रिडा शिक्षक नियमित पद मंजूर होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने एक क्रिडा शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अशी देखील मागणी शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदिवासी मंत्री के.सी पाडवी यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा ः राजीनामास्त्र, काहींना निष्ठा दाखवायची अन् पदही टिकवायचे आहे..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख