जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शिवसेना आमदार तालुका प्रमुखांना देणार बक्षीस..

संघटनात्मक पातळीवर आपण आपसातील मतभेद विसरून कोरोना सारख्या आपत्तीमध्ये जनतेला मदत करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
Shivsena Mla Tanji Sawant prize Declear  News Osmanabad
Shivsena Mla Tanji Sawant prize Declear News Osmanabad

उस्मानाबाद  ः मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे जिल्ह्यातील वजनदार नेते आमदार प्रा. तानाजी सावंत पुन्हा सक्रीय झाले आहेत. बार्शी येथील १ हजार बेडच्या कोरोना केंद्राचे उद्धाटन शिवसनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर सांवत यांची नाराजी काहीशी दूर झाल्याचे बोलले जाते. (Shiv Sena MLA Tanaji Sawant to give prize to taluka chief for freeing district Corona ) जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करत सावंत यांनी पक्ष पातळीवरील बैठकांवर जोर दिला आहे. एवढेच नाही तर जो तालुका कोरोनामुक्त होईल, त्या तालुक्याच्या शिवसेना तालुक्रा प्रमुखास पाच लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा देखील सांवत यांनी केली.

कोरोना काळात आमदार सावंत हे वाशी-भूम-परांडा या आपल्याच मतदारसंघात फिरकले नव्हते. या संदर्भात लोकांकडून ओरड सुरू झाल्यानंतर एक दिवस अचानक मतदारसंघात येऊन त्यांनी एका झटक्यात तेथील प्रश्न मार्गी लावले होते. बार्शी येथे कोरोना सेंटर आणि त्याच्या उद्धाटन कार्यक्रमात मंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना दिलेला कानमंत्र यानंतर सावंत पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. (He called a meeting of Shiv Sena office bearers and appealed to the people to help.) नुकतीच त्यांनी कोरोना संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकांना मदत करण्याचे आवाहन केले.

सावंत म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सक्षमपणे ब्रेक द चेन मोहिम राबविण्यात येत आहे. (The Break the Chain campaign is being implemented competently across the district.) प्रत्येक शहर, गाव, वाडी, वस्ती व तांड्यावर शिवसैनिकांनी रिक्षाला भोंगे लावून जनजागृती व कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेला औषधोपचार करण्यासाठी रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.

सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना पक्ष म्हणून आपले नेमके काय चालले आहे याची कोणाला माहितीच नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर आपण आपसातील मतभेद विसरून कोरोना सारख्या आपत्तीमध्ये जनतेला मदत करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. 

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील खासगी डॉक्टर काय करीत आहेत याची माहिती घेऊन कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली काम करुन पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. (Efforts should be made to strengthen the party organization by working under the saffron flag of Shiv Sena.) लोकांची सेवा करण्याची संधी आली असून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अॅम्बुलन्स वाटप करण्याबरोबरच त्या रुग्णांना आवश्यक सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांवत यांनी सांगितले.

सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय सर्वसामान्यांपर्यंत प्रशासन पोहोचवीत नसल्याने ते काम शिवसैनिकांनी करण्याची गरज आहे. शिवसैनिकाने जनतेच्या सेवेसाठी आक्रमक होण्याची वेळ असुन हे कार्य पक्षाच्या झेंड्याखाली व्हायला हवे असा आग्रही सावंत यांनी बैठकीत धरला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले आदी उपस्थित होते.

तर.. तालुकाप्रमुखाला पाच लाखांचे बक्षीस

जो तालुका कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर  आणण्याचा प्रयत्न करील‌ त्या तालुका प्रमुखाला शिवसेनेच्यावतीने मी वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांचे बक्षीस देणार असून (On behalf of Shiv Sena, I will personally give a prize of five lakh rupees) मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्या तालुकाप्रमुखांचा सत्कार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Edited by : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com