मंत्री भुमरेंना माफी नाही, खंडपीठाने माफीनामा फेटाळाला..

सामान्य माणूस आणि राजकारणी,मंत्री हे कायद्यापेक्षा वरचढ ठरतात का? असा सवाल करत संदीपान भुमरे यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते.
high Court Reject Minister Bhumre Aplication News
high Court Reject Minister Bhumre Aplication News

औरंगाबाद ःराजकीय पुढाऱ्यांच्या जाहीर उद्घाटन कार्यक्रमांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. (Minister Bhumare has no apology, the bench rejected the apology.) राज्य सरकारला खडेबोल सुनावल्यानंतर राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा बिनशर्त माफीनामा देखील फेटाळला आहे.

कोरोना काळात गर्दी जमवून उद्घाटन व विविध कार्यक्रम राजकीय पुढाऱ्यांकडून घेतले जात आहेत. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत खंडपीठाने अशा नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले होते.(blaming Sandipan Bhumare for trying to throw dust in the court.) संदीपान भुमरे यांनी न्यायालयात धूळफेक करण्याचा  प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत खंडपीठाने त्यांचा बिनशर्त माफीनामा स्वीकारला नाही. त्यांनी केलेला फौजदारी अर्जही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे  न्या.रविंद्र घुगे आणि न्या.बी.यू.देबडवार यांनी निकाली काढला.

विविध वृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेत जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान कालच्या सुनावणीत खंडपीठाने भुमरे यांचा माफीनामा फेटाळला. संदीपान भुमरे यांच्या वतीने अ‍ॅड.सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली.  रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री म्हणून त्यांच्या उपस्थितीत ७ मे  रोजी पैठण तालुक्यातील  देवगाव  येथे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण याची मंत्र्यांना कल्पना नव्हती, ते नेहमीच्या भेटीसाठी गावात पोहोचले होते.

तेथील गर्दी पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लॉकडाउन काळातील निर्बंधांचे उल्लंघन करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. याबद्दल त दिलगिरी व्यक्त करतो. (Bhumare had mentioned in his application to the court that he had visits to inform about the plans.) रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांना काम मिळावे यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी माझे दौरे असतात असे भुमरे यांनी कोर्टात दिलेल्या अर्जात नमूद केले होते.

मुख्य सरकारी वकील डी.आर.काळे यांनी सांगितले की, भुमरे यांनी  न्यायालयात बिनशर्त माफी मागितल्यामुळे गुन्हा नोंदवण्याचे कारण नाही.  मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघाची भेट न जाहीर करता अचानक भेट दिली आणि तिथे लोकांनी गर्दी केली, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला हे शक्य नसल्याचे मत  न्यायालयाने  व्यक्त  केले.

मंत्र्यांकडून धुळफेकीचा प्रयत्न

या दरम्यान घडलेला घटनाक्रम ग्रामसेवकांनी पाच जणांविरूद्ध दाखल केलेला गुन्हा, भुमरे यांच्या कार्यालयाकडून देवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेला फोन याची माहिती देत, मंत्र्यांनी आपल्या अर्जाद्वारे धूळफेक करण्याचा  प्रयत्न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. तसेच  फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदींच्या नुसार  हा फौजदारी अर्ज  विचारात घेऊ  शकत नाही आणि अर्जदार संदीपान आसाराम भुमारे यांची बिनशर्त माफी स्वीकारत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सामान्य माणूस आणि राजकारणी,मंत्री हे  कायद्यापेक्षा वरचढ ठरतात का? असा सवाल करत संदीपान भुमरे यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते. (Doesn’t the corona spread because of the public programs of political leaders) राजकीय पुढाऱ्यांच्या जाहीर कार्यक्रमांमुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का, असा सवाल राज्य सरकारला खंडपीठाने केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही जाहीर कार्यक्रम घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई का होत नाही? असाही प्रश्न खंडपीठाने केला होता.

कोरोनाकाळातही अनेक नेते आणि पुढारी कार्यक्रम करत गर्दी जमवत आहेत. तसेच पोलिसही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही.  जाहीर कार्यक्रम घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई का होत नाही असा संतप्त सवालही खंडपीठाने केला होता. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com