शिवसेना शिस्तीवर चालणारा पक्ष, आदेश डावलणाऱ्यांवर कारवाई होणार..

लातूरमध्ये केलेले बदल स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारले असले तरीबीडमध्ये मात्र नव्या जिल्हाप्रमुखांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला.
Shivsena Leader Chandrakant Khaire Reaction News
Shivsena Leader Chandrakant Khaire Reaction News

औरंगाबाद ः  बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यातच जाधव यांच्या जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल काढण्यात आलेल्या मिरवणूकीतच त्यांच्या निवडीला माजलगाव येथील शिवसेना शहरप्रमुखाने विरोध केला. मिरवणूकीतच जाधव यांच्या अंगावर वंगण टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे जाधव समर्थकांनी त्याला चोप दिला. (Shiv Sena disciplinary party, action will be taken against those who break the order) या राड्यामुळे एकच खळबळ उडाली, आता या प्रकारावर बीडचे संपर्कप्रमुख शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

शिवेसना हा शिस्त आणि आदेशावर चालणारा पक्ष आहे, संघटनेते केले जाणारे बदल हे वरिष्ठांच्या आदेशानूसार आणि सर्वांना विश्वासात घेऊनच केले जातात. (Shivsena Leader Chandrakant Khaire) त्यामुळे वरिष्ठांचे आदेश डावलणाऱ्या आणि पक्षशिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई पक्षाच्या वतीने लवकरच केली जाईल, असेही खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले. मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर आहे. (Beed Shivsena District Chief)

गेल्या काही दिवसांत नव्याने पक्षाची बांधणी आणि पदाधिकारी बदलण्याच्या दृष्टीने त्यांनी या तीनही जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यानंतर बीड आणि लातूर या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुकत्या करण्यात  आल्या. यात  जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांची नव्याने नेमणूक करण्यात आली. लातूरमध्ये केलेले बदल स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारले असले तरी बीडमध्ये मात्र नव्या जिल्हाप्रमुखांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला.

जाधव यांची जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक झाल्याचे जाहीर होताच बीडमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला. तर जिल्हाप्रमुख बदल कुणाऱ्या भल्यासाठी केला, असा आरोप देखील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर काल माजलगांवमध्ये जो प्रकार घडला त्याने तर शिवसेनेतील कडक शिस्तीलाच गालबोट लागले. जाधव यांच्या माजलगांव येथील मिरवणूकीतच त्यांचे समर्थक आणि विरोधक भिडले.

जाधव यांच्या निवडीला विरोध दर्शवत माजलगाव येथील शहरप्रमुखांनी दोन दिवसाआधीच भर रस्त्यावर उभे राहून निषेध केला होता. त्यानंतर काल जाधव यांच्या मिरवणूकीत थेट वंगण फेकत पुन्हा निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे जाधव समर्थकांनी शहरप्रमुखाला लाथाबुक्या आणि पट्ट्याने मारहाण केली. या राड्यामुळे शिवसेनेची नाचक्की तर झालीच पण संपु्र्ण राज्यात या मारहाणीची व्हिडिओ पोहचला.

बेशिस्त खपवून घेणार नाही..

यावर बीड जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. खैरे म्हणाले, जाधव यांची जिल्हाप्रमुख पदी झालेली निवड ही सर्वानुमते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने झाली आहे. त्यामुळे या निवडीला विरोध करणे म्हणजे उध्दव ठाकरेंचा आदेश डावलण्यासारखे आहे.

शिवसेना हा शिस्तीवर चालणारा पक्ष आहे, इथे आदेशाचे पालन केले जाते. आम्ही नेते मंडळी देखील वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतो, त्यामुळे जिल्हाप्रमुखांच्या अंगावर काळे फेकण्याचा झालेला प्रकार आणि त्यानंतर झालेली मारहाण हे चुकीचे आहे. याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. शिवसेनेत अशा प्रकारची बेशिस्त कधीच खपवून घेतली जाणार नाही, त्यामुळे संबंधितांवर लवकरच कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही खैरे यांनी स्पष्ट केले. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com