भाजपकडून शिवसैनिकांचा छळ होतोच, पण आम्ही संकटाला घाबरत नाही..

सरनाईक हे आपल्या मतदारसंघाविषयी बोलले असतील तर ते सहाजिकच आहे. राहिला प्रश्न भाजपकडून होणाऱ्या त्रास व छळाचा तर याची संपुर्ण कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील आहे.
Shivsena Mla Ambadas Danve reaction News Aurangabad
Shivsena Mla Ambadas Danve reaction News Aurangabad

औरंगाबाद ः भाजपकडून शिवसैनिकांचा छळ होतच असतो, केंद्रातील तपास यंत्रणांना हाताशी धरून त्रास देण्याचे उद्योग सुरूच आहेत, हे महाराष्ट्राने देखील पाहिले आहे. पण शिवसैनिक हा संकटांना कधीच घाबरत नाही. (Shiv Sainiks are being persecuted by BJP, but we are not afraid of crisis.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील भाजपच्या या वागणुकीची कल्पना आहे, म्हणूनच त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपच्या छळवणूकीचा अनुभव आल्यामुळेच त्यांनी आपल्या मनातील भावना पक्षप्रमुखांकडे व्यक्त केल्या असतील, त्यात गैर काहीच नाही. (Shivsena Mla, Spoake Person Ambadas Danve) पण शिवसैनिक अशा संकटांना न डगमगता ते परतवून लावण्याची क्षमता ठेवतात, हे संकट देखील आम्ही परतवून लावू,अशा शब्दात शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली. (Shivsena Mla Pratap Sarnaik) या पत्रात काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांना कसा फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे सांगतांनाच आगामी निवडणूका लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेतले तर भाजपचा त्रास आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना होणार नाही, असे देखील सरनाईक यांनी या पत्रामध्ये नमूद केले.

या लेटरबाॅम्ब नंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे प्रवीण दरेकर आदी नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांना या पत्रा संदर्भात विचारले असता दानवे म्हणाले, काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या नेत्यांना फोडण्याचे प्रयत्न होत आहेत, असा दावा सरनाईक यांनी आपल्या पत्रात केला आहे.

मात्र महाराष्ट्रात आतापर्यंत तरी शिवसेनाचा कोणाताही मोठा नेता किंवा लोकप्रतिनिधी काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात गेल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सरनाईक हे आपल्या मतदारसंघाविषयी बोलले असतील तर ते सहाजिकच आहे. राहिला प्रश्न भाजपकडून होणाऱ्या त्रास व छळाचा तर याची संपुर्ण कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील आहे. म्हणूनच भाजपशिवाय सत्ता स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून शिवसेनेच्या लोकप्रतिनीधी, नेत्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर देखील भाजपकडून शिवसेनेला छळण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र शिवसैनिक अशा संकटांना घाबरणारा नाही. अशी अनेक संकट शिवसैनिकांनी मोठ्या हिंमतीने परतवून लावली आहेत. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीच डगमगत नाही.

कितीही संकट आली तर ती परतवून लावण्याची धमक शिवसेना व शिवसैनिकांत आहे. त्यामुळे सरनाईक यांच्यावर आलेले संकट देखील आम्ही परतवून लावू, याबद्दल मला खात्री आहे. सरनाईक यांनी आपल्या भावना या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत, एवढाच या पत्राचा अर्थ आहे. त्यावरून वेगळे अर्थ काढले जाऊ नये, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com