कव्वालीच्या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण.. - Scattering of notes on Imtiaz Jalil in Qawwali program .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कव्वालीच्या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जुलै 2021

कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण होत असतांना इम्तियाज जलील यांनी ती होऊ दिली याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

औरंगाबाद ः  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या सन्मानार्थ आयोजित `जश्न ए शान इम्तियाज जलील`, या कव्वालीच्या कार्यक्रमात त्यांच्यावर समर्थकांनी नोटांची उधळण केली. (Scattering of notes on Imtiaz Jalil in Qawwali program) दौलताबाद किल्ल्यांच्या पायथ्याशी एका रिसाॅर्टमध्ये रंगलेल्या या कव्वालीला शेकडो जणांची गर्दी होती.

जिल्ह्यात कोरोना आणि डेल्टा प्लसचे रुग्ण वाढू नये यासाठी प्रशासनाने पुन्हा निर्बध लावले आहेत. (AIMIM Mp Imtiaz Jalil Aurangabad) असे असतांना लोकप्रतिनिधी असलेल्या इम्तियाज जलील यांचा या कार्यक्रमातील सहभाग, त्यांच्यावर झालेली नोटांची उधळण आणि विशेष म्हणजे कोरोना नियमांचे करण्यात आलेले उल्लंघन यामुळे इम्तियाज जलील पुन्हा वादात सापडले आहेत.

इम्तियाज जलील यांच्यावर यापुर्वी दोन गुन्हे कोरोना काळात गर्दा जमवणे, अधिकाऱ्यांना धमकावणे बाबात दाखल झालेले आहे. असे असतांना त्यांनी पुन्हा कव्वालीच्या जाहीर कार्यक्रमात सहभाग नोंदवून गर्दी जमवल्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. इम्तियाज जलील हे सुशिक्षित, पत्रकार असलेले खासदार आहेत.

जनतेच्या प्रश्नावर ते अनेकदा आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाला धारेवर धरतात. दोन वर्षात खासदार म्हणून त्यांनी केलेले काम, संसदेत मतदारसंघ व मराठवाड्यातील विविध प्रश्नानांना फोडलेली वाचा, केलेली आंदोलन याबद्दल सर्वसामान्यांनी त्यांचे कौतुकही केले.

पण उत्साहाच्या भरात कोरोना सारख्या संकटात त्यांच्याकडून काही चुका देखील घडल्या. शहरातील लाॅकडाऊन संदर्भात इम्तियाज जलील यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आणि योगायोगाने लाॅकडाऊनचा निर्णय रद्द झाला. त्याचे श्रेय घेण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी जमावबंदी आदेश मोडत त्यांना खाद्यांवर घेऊन मिरवणूक काढली होती.

या प्रकरणी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे देखील झाले होते. त्यानंतर छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक हातावर पोट असणाऱ्या लोंकाना प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने दंड लावल्याचा मुद्दा हाती घेत इम्तियाज यांनी आंदोलन केले.

कामगार उपायुक्त कार्यालयात जाऊन त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. पण याही प्रकरणात त्यांच्यावर गर्दी जमवणे, धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग..

गुन्हे दाखल झाल्यावरही इम्तियाज जलील यांना व्यापारी, व्यावसायिकांची सहानुभूती मिळाली. परंतु कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण होत असतांना इम्तियाज जलील यांनी ती होऊ दिली याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोना अजून पुर्णपणे संपलेला नाही. शहरी भागात रुग्ण संख्या घटली असली तरी ग्रामीण भागात डेल्टा प्लसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा संकटाच्या काळात खासदार असलेल्या व्यक्तीने एवढ्या निष्काळजीपणाने वागावे, याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

विशेष म्हणेज सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतांना या कार्यकर्माचे आयोजन कसे केले, त्याला परवानगी होती का? जर असेल तर कुणी दिली असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

या शिवाय रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या कव्वालीच्या महफीलीत खासदारांसह एकांच्याही तोंडाला मास्क नव्हता. कोरोना संकट असतांना एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अशाप्रकारचा निष्काळजीपणा योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांतून उमटत आहेत.

हे ही वाचा ः मी फडणवीसांना म्हणालो होतो, शिवसेनेला अडीच वर्ष द्या, पण..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख