मी फडणवीसांना म्हणालो होतो...शिवसेनेला अडीच वर्ष द्या; पण! 

कोरोनाच्या काळात आरोग्य खाते चालवणे सोपे नसले तरी राजेश टोपे यांनी हे खाते व्यवस्थित सांभाळले आहे.
 Ramdas Athavale, Devendra Fadnavis .jpg
Ramdas Athavale, Devendra Fadnavis .jpg

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnis) यांनी माझे ऐकले असते तर बरे झाले असते. मी त्यांना सांगत होतो की शिवसेनेसोबत अडीच वर्ष मान्य करा, तुम्हाला वाटत नव्हते तर मला मुख्यमंत्री करा, पण माझे ऐकले नाही, आता 5 वर्ष विरोधी नेते राहण्याची वेळ आली आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी म्हटले आहे. (Ramdas Athavale says that I had told Devendra Fadnis to give the post of Chief Minister to Shiv Sena for two and a half years)  

आठवले मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. आठवले म्हणले, कोरोना रुग्ण मी मी सुद्धा होतो. कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले. पण, डॉक्टरांनी लाखो लोकांना वाचवले अनेक रुग्णांना रुग्णालयात पाठवले तेव्हा मला बॅाम्बे हॉस्पिटलचे दिवस आठवले. मी सुद्धा गो कोरोनाचा नारा दिला होता. त्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असताना मला वाटले की मीच गो होतोय की काय? कोरोना झाल्यानंतरचा अनुभवही त्यांनी सांगितला. कोरोनाच्या काळात आरोग्य खाते चालवणे सोपे नसले तरी राजेश टोपे यांनी हे खाते व्यवस्थित सांभाळले आहे, असे ही आठवले यांनी सांगितले. 

दरम्यान, भारताने स्वतःची लस तयार केली, भारतात पूर्ण लसीकरण केले. पण, आपण जगाला लस पुरवू, संकटात कोण सोबत राहते हे महत्त्वाचे आहे. संकटात डॉक्टर आणि कर्मचारी एकटे नाहीत हे दाखवून देण्यासाठी कोरोना काळात राज्यभर दौरा केला. राजेश टोपे यांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. त्यांनी राज्यभर दौरे केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जे काम राहिले आहे त्याबद्दल अधिवेशनात बोलणार, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

राजेश टोपे म्हणले की ''मी दररोज माझ्या ट्विटर वरून रुग्णाची माहिती देत होतो. राज्यात दोन्ही लाटेत मिळून 60 लाख कोरोना रुग्ण आहेत. 58 लाख 45 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आता पर्यंत ९६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 3 कोटी 39 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. शनिवारी तर लसीकरणाचा उच्चांक गाठला. टेस्टिंग करणारे डॉक्टर, नर्स यांचा खरतर सन्मान आहे. महाराष्ट्राने लसीकरणाचा मोठा पल्ला गाठला, असल्याचे टोपे यांनी सांगितले.    

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com