माझी मानहानी झाली, `त्या` रिक्षाचालकाची आमदार दानवे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार..

मी त्यांना माझी चूक काय आहे हे विचारत होतो. तेव्हा त्यांच्यासोबत पोलिसही होते, मला दानवे यांनी विनाकारण मारहाण व शिवीगाळ केली.
Complent Against Shivsena Mla Ambadas Danve News Aurangabad
Complent Against Shivsena Mla Ambadas Danve News Aurangabad

औरंगाबाद ः क्रांतीचौकात झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करतांना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी एका रिक्षाचालकाला कानफटावले होते. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. (The rickshaw puller lodged a complaint with the police against MLA Danve.) आता या रिक्षाचालकाने अंबादास दानवे यांच्याविरोधात क्रांतीचौक पोलीसात तक्रार दिली आहे. माझी चूक नसतांना दानवे यांनी मला मारहाण केली व त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने माझी बदनामी झाल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी दानवे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील ईमेलद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीत त्या रिक्षाचालकाने केली आहे. ( Police Complent Against Shivsena Mla Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी बेशिस्त रिक्षाचलाकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ काल सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. याबद्दल दानवे यांनी स्पष्टीकरण देत वाहतूककोंडी सुरळीत करत असताना हा रिक्षाचालक मध्येच घुसला त्यामुळे त्याला समज दिली, असे म्हणत समर्थन केले होते.

मात्र आता याच रिक्षाचालकाने पोलिसांकडे तक्रार देत दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. अशोक अजय जाधव असे या रिक्षाचालकाचे नाव असून तो शहरातील वेंदातनगर, व्यंकटेश काॅलनी, उस्मानपुरा  येथे राहतो. त्याने क्रांतीचौक पोलिस निरीक्षकांना ईमेल पाठवत तक्रार केली असून त्याची प्रत पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक मुंबई यांना देखील पाठवली आहे.

अजय जाधव याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २८ जून रोजी लाॅकडाऊन लागणार म्हणून मी मित्राची रिक्षा एमएच-२०, ईएफ-३२२५ ही घेऊन किराणा सामान व भाजीपाला आणण्यासाठी शहागंज, मोठा येथे जात होतो. त्याचवेळी क्रांतीचौकात वाहतूककोंडी झाल्यामुळे मी रिक्षा मोंढानाकाकडे वळवत होतो. त्यावेळी पेट्रोल पंपाच्या अलीकडे दुपारी एकच्या दरम्यान, ७-८ शिवसैनिक घेऊन आमदार दानवे आले होते. त्यांनी मला शिवीगाळ करून मारहाण  करण्यास सुरूवात केली.

माझी चूक नव्हती, तरी..

मी त्यांना माझी चूक काय आहे हे विचारत होतो. तेव्हा त्यांच्यासोबत पोलिसही होते, मला दानवे यांनी विनाकारण मारहाण व शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल केला. या व्हिडिओमुळे माझी बदनामी झाली आहे. मित्र, नातेवाईकांनी माझ्या आई-वडिलांना व मला ह्या बाबत अपमानास्पद बोलून या प्रकाराबद्दल विचारणा केली.

पोलिसांसमक्ष आमदार साहेबांनी मला मारहाण व शिवीगाळ केली. याबद्दल संबंधित पोलीस, आमदार साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून मला न्याय द्यावा, अशी मागणी देखील तक्रारीत करण्यात आली आहे. माझी चूक नसतांना मला मारहाण व शिवीगाळ केली, चूक असती तर पोलिसांनी माझ्यावर कारवाई करायला पाहिजे होती. पण आमदार दानवे यांनी मला मारहाण करून माझी मानहानी केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जाधव याने तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, मेलद्वारे तक्रार दिल्यानंतर आपण क्रांतीचौक पोलिसांकडे समक्ष जाऊन लेखी तक्रार देखील देणार आहोत, असे अजय जाधव यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com