पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा तालुका झाला भावूक..

सगळ्याचा प्रेमाचा स्वीकार करत कदम यांनीही कुणाची गळाभेट घेत तर कुणाशी हातमिळवत प्रत्येकाचे आभार मानले.
Police Inspector Transfer News Shiruranantpal-Latur
Police Inspector Transfer News Shiruranantpal-Latur

लातूर-शिरुरअनंतपाळ ः एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुले उधळून, फटाके वाजवून त्यांना जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम क्वचितच पहायला मिळतो. (Replacement of police officer; People became emotional) लातूर जिल्ह्यातील शिरूरअनंतपाळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला.

गेली दोन वर्षे परमेश्वर कदम यांनी शिरूरअनंतपाळ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. सर्वसामान्यांशी संपर्क वाढवत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. (Shiruranantpal Police Station, District Latur) दबंग, कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संवेदनशील अशी ओळख असलेले पोलिस निरीक्षक  परमेश्वर कदम यांची तालुका जळकोट येथे बदली झाली.

प्रशासकीय कारणाने झालेल्या बदलीमुळे त्यांना जळकोट येथे रूजू होणे गरजेचे होते. तालुक्यातील ग्रामस्थ, गावोगावचे पोलीस पाटील व जेष्ट नागरिक , पञकार व पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी त्यांना आज निरोप दिला.  या निरोपाच्यावेळी पोलिस ठाण्यातून ते आपला मुलगा, पत्नी यांच्यासह बाहेर पडले तेव्हा उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली.  प्रत्येकजण हस्तांदोलन करत त्यांना भावूक होऊन निरोप देत होता.

सगळ्याचा प्रेमाचा स्वीकार करत कदम यांनीही कुणाची गळाभेट घेत तर कुणाशी हातमिळवत प्रत्येकाचे आभार मानले.  यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक भावूक झाले होते.  कोरोनाकाळात पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी जनजागृतीसाठी युवकांच्या मदतीने  कोरोना फोर्सचे विशेष पथकं तयार केली होती . लसीकरणासाठी गाव, वस्ती, तांड्यावर जाऊन नागरिकामध्ये जनजागृतीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता.

अनेक कुटुंबीयांना स्वखर्चातून संसारोपयोगी साहित्य, किराणा, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू देऊन वेळोवेळी माणुसकीचे दर्शनही घडविले. ‘पोलिस हाच जनतेचा खरा मित्र’ही संकल्पना राबविल्याने नागरिकांबरोबरच सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्‍यांमध्ये ते लोकप्रिय ठरले होते.

यावेळी नवीन आलेले पोलीस निरिक्षक सुडके यांचाही सत्कार करण्यात आला. निरोप देत असतांना अनेकांना अश्रु अनावर झाले होते. नागरिकासह सर्वच जमलेल्या नागरिकांना भावना अनावर झाल्या होत्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com