शिवसेनेच्या खासदारांचे सर्वपक्षीय आंदोलन म्हणजे नौटंकी.. - The all-party agitation of Shiv Sena MPs is a gimmick.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

शिवसेनेच्या खासदारांचे सर्वपक्षीय आंदोलन म्हणजे नौटंकी..

गणेश पांडे
गुरुवार, 2 सप्टेंबर 2021

केवळ महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन केले जात आहे.

परभणी : शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी सुरू केलेले हे आंदोलन नाटकी असून, येत्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. (The all-party agitation of Shiv Sena MPs is a gimmick.Said Bjp Mla Meghna Bordikar)  महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरले आहे, असेही त्या म्हणाल्या.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. (Shivsena Mp Sanjay Jadhav Parbhani) धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता. (Congress Mla Suresh Varpudkar) या पार्श्वभूमीवर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी बुधवारी (ता. दोन) पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन नौटंकी असल्याचा आरोप केला.

मेघना बोर्डीकर म्हणाल्या, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधी व नेत्यांचे राज्य पातळीवरील नेत्यांकडे वजन राहिलेले नाही. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे ही भाजपाची देखील मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात परभणीच्या शासकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने तयारी पूर्ण करण्यात आली होती.

परंतु, नंतर दुर्दैवाने महा विकास आघाडी सरकार स्थापन झाले. या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांमध्ये परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याची मानसिकताच नाही. वैद्यकीय महाविद्यालय द्यायचे असते तर अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद केली असती. मी विधानभवनात मागणी केल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या भाषणात ओझरता उल्लेख केला. पण एक रुपया निधी देऊ केला नाही.

जिल्ह्यातील नेत्यांचे मुंबईत वजनच नाही..

परभणी येथे गेल्या दोन दिवसापासून शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या पुढाकारातून आंदोलन केले जात आहे. त्या माध्यमातून केवळ जनतेला वेठीस धरण्याचे काम होत असल्याचा आरोपही बोर्डीकर यांनी केला. केवळ महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन केले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी परभणीत आंदोलन करून भागणार नाही. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करावे. त्या आंदोलनाला भाजप निश्चित पाठिंबा देईल. परंतु, परभणीतील नेत्यांचे वरिष्ठ नेत्याच्या दरबारात वजनच नाही. या नेत्यांनी राज्य शासनाद्वारे परभणीतल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा. तो मंजूर करून घेण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे आव्हान भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिले. 

हे ही वाचा ः सुभाष देसाईंनी संभाजीनगर करून दाखवले, दौऱ्याच्या कार्यक्रमात दहावेळा उल्लेख..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख