पंकजा मुंडे बांधलेले हात कधी सोडणार?

मजकूराचा शब्दश: अर्थ त्यांना खरा वाटत असेल तर ट्विट करुन भागणार नाही. आता बांधलेले हात सोडण्याची वेळ आली आहे.
Pankaja Munde News Beed
Pankaja Munde News Beed

बीड : करुणा शर्मा - मुंडेंचा परळी दौरा, अॅट्रॉसिटीसह, जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा, अटक आणि न्यायालयीन कोठडी अशा नाट्यमय घडामोडींनी राज्यपातळीवर गाजला. आता यावर धनंजय मुंडे यांच्या राजकीय विरोधक व बहिण असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. (When elease the hand tied by Pankaja Munde for the common man?) घटनेच्या तिसऱ्या दिवशी पंकजा मुंडे यांनी ट्विट करत `परळी सुन्न आहे आणि राज्याची मान खाली गेली आहे`,अशा शब्दांत पंकजा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

जर चुकीच्या लोकांच्या हातात ताकद आल्याने अन्याय झाला असेल, तर पराक्रमी म्हणून त्या आणि त्यांचा जिल्ह्यातला पक्ष बांधलेले हात कधी सोडणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. `अन्याय चुकीच्या लोकांत ताकद असल्यामुळेच होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. (Bjp Leader Pankaja Munde Beed) शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हारवू नये, असे ट्विट करत पंकजा यांनी करुणा शर्मा-मुंडे प्रकरणात आपले मत व्यक्त केले होते.

यातून त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची, असा चिमटाही पकंजा यांनी ट्विटच्या माध्यमातून काढला. (Karuna Sharma-Munde) समाज माध्यमांवर पंकजा यांच्या ट्विटला भरपूर प्रतिसाद मिळाला. शेवटच्या ओळीतील परळी सुन्न आहे या वाक्यावरुन त्यांच्या ट्विटचा रोख उघड आहे.  पण, त्यांनी सुरुवातीलाच अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकद असल्यामुळे होतो, असे नाही तर पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो, असे म्हटले  आहे.

पण, अगदी परळीच का, सगळेच घटक सुन्न होते दोन दिवसांत. पण, त्यांच्यासह सगळ्यांनाच अन्याय होतोय हे उमगायला उशिर का, झालाय असा प्रश्न आहे. मुद्दा परळीतील कथित करुणा शर्मांबाबतचाच नाही तर रोजच्याच जिल्ह्यातील कायदा व सुवस्थेचा आहे. जरी आज ताकद इतरांकडे असली तरी पंकजा मुंडेही पराक्रमी आहेतच. विशेष म्हणजे बेधडक आणि मतांवर त्या ठाम असतात.  मग या प्रकरणात बांधलेले हात त्या कधी सोडणार? असा प्रश्न आहे.

अगदी अन्याय होताना दिसत असताना त्यांचे समर्थक आणि जिल्हा भाजप चिडीचुप राहते.  फक्त परवाच्या परळीतल्या घटनेच्या दिवशीच नाही तर रोजच. मग, हात बांधण्याने आणि न सोडण्याने अन्याय होणारच. जर, आज करुणा शर्मा - मुंडेंवर झाला असे म्हणायचे असेल तर रोज इतरांवर होत नसेल? भविष्यात होणार नाही? असाही प्रश्न पडतो.  त्यांनी शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी दारात बांधू शकत नाही, हा विश्वास हरवू नये असेही नमूद केले आहे.

जर, सामान्यांना असे काही वाटत असेल तर त्यांचे प्रतिनिधीत्व आणि नेतृत्व करावे लागणार आहे. जर, ट्विटमधील मजकूराचा शब्दश: अर्थ त्यांना खरा वाटत असेल तर ट्विट करुन भागणार नाही. आता बांधलेले हात सोडण्याची वेळ आली आहे, जिल्ह्यातल्या भाजपसाठी आणि सामान्यांसाठीही हे तितकेच खरे.  जर, नेत्यांची खदखद अशी असेल तर समर्थक म्हणवून घेणाऱ्यांनी फक्त त्या आल्यानंतर घोषणांची आरोळी देण्यापेक्षा त्यांच्या अपरोक्षही किल्ला लढवायला हवा.

फक्त मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करुन दुसरीकडे मंदीरांच्या जमिनी लुबाडण्यात वाटेकरी झाले तर मग अन्याय होतोय म्हणण्यापेक्षा वाट्यात अन्याय होतोय असे म्हणावे लागेल. आता अन्याय खरोखर झाला का, चुकीच्या लोकांच्यात ताकद आली का, शासन, प्रशासन व्यवस्था कोणी दारात बांधू पाहतेय का, असे प्रश्न जरी पंकजा मुंडे यांना पडले असले तरी सामान्यांना किती पडतात हेही तेवढेच महत्वाचे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com