अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याला पावणे नऊ कोटींचा गंडा..

सदर कंपनीचे संचालक व इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संगनमत करून कारखान्याची साखर खुल्या बाजारात विक्री करून फसवणूक केली आहे.
Vilas Sugar Factory News Latur-Amit Deshmukh
Vilas Sugar Factory News Latur-Amit Deshmukh

लातूर ः  शहरापासून जवळ असलेल्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याची फसवणूक केल्या प्रकरणी अहमदनगर येथील एका व्यक्तीला नांदेड येथून लातूर पोलिसांनी अटक केली आहे. (Amit Deshmukh's sugar factory gets Rs 9 crore Duped)  अन्य दोघांना नांदेडच्या कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निवळी येथील साखर कारखान्यातील ८ हजार ३६४ मेट्रिक टन साखर निर्यात करायची होती. (Let.Vilasra Deshmukh Suger Factory Latur.) त्यासाठी चेन्नई येथील 'कुरिंजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'चे प्रतिनिधी अभिजीत देशमुख याच्यामार्फत कंपनीसोबत करार करण्यात आला होता.

त्यानुसार निवळीच्या कारखान्यातून साखर घेऊन गेल्यापासून ९० दिवसांच्या आत सदरील साखर निर्यात केल्याबाबतचे कागदोपत्री पुरावे कारखाना प्रशासनास सादर करणे आवश्यक होते. (Minister Amit Deshmukh, Maharashtra)

परंतु असे असताना सदर कंपनीने कागदपत्रे कारखान्यास सादर केलेली नाहीत. कारखाना प्रशासनाने वेळोवेळी कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा कागदपत्रे देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे, साखर कारखान्याचे ८ कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले.

सदर कंपनीचे संचालक व इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संगनमत करून कारखान्याची साखर खुल्या बाजारात विक्री करून फसवणूक केली आहे. निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याचे विधी सहाय्यक अशोक तोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी अभिजीत वसंतराव देशमुख याला आता अटक करण्यात आली आहे.

आरोपी अभिजीत देशमुख याने दिलेल्या माहितीवरून तामिळनाडू येथील प्रदीपराज चंद्राबाबू व एडीगा उर्फ मनीकांत उर्फ मुनीकृष्णा या अन्य दोन आरोपींना नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु 'कुरींजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमीटेड कंपनी' च्या संचालक मंडळाचा प्रमुख असलेला बालाजी उर्फ पांडू शेट्टी हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in