लोक आधीच घाबरलेले आहेत, तिसरी लाट येणार म्हणून त्यांना आणखी भीती घालू नका..

`काळजी घ्या, कोरेानाचे नियम पाळा` असा सल्ला देऊन जरी तिसरी लाट आली तर `आम्ही समर्थ आहोत, खंबीर पाठीशी आहोत, घाबरु नका` असा धीर सर्वांनीच सामान्यांना देण्याची गरज.
Bjp Mla Suresh Dhas News Ashti-Beed
Bjp Mla Suresh Dhas News Ashti-Beed

बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कित्येकांच्या घरातील लोकांचा मृत्यू झाला, आणखी शेकडो मृत्यूंची नोंदही नाही. यामुळे सामान्य लोक अगोदरच डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. त्यांना या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्याऐवजी तिसरी लाट येणार आहे, मुलांना धोका आहे, अशी भीती घालून आणखीच डिप्रेशनमध्ये घातले जात असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. (People are already scared, don't be afraid of the third wave.) सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सामान्यांना पाठबळ द्यायला हवे, ‘काळजी घ्या, कोरोनाचे नियम पाळा’पण घाबरु नका, आम्ही समर्थ आहोत, खंबीर पाठीशी आहोत, असा धीर द्यायला हवा असेही धस म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्यातील कहर, त्यांच्या पुढाकाराने मच्छिंद्रनाथ देवस्थान, आष्टी तालुका सहकारी दुध संघ व कडा बाजार समितीच्या पुढाकाराने उभारलेल्या कोविड केअर सेंटरच्या (Bjp Mla Suresh Dhas Ashti-Beed) माध्यमातून कोरोनाग्रस्तांवरील उपचार आणि सध्याही असलेला संसर्ग व संभाव्य तिसरी लाट तसेच लॉकडाऊनचे होत असलेले गंभीर परिणाम या विषयांवर सुरेश धस यांनी `सरकारनामा``शी संवाद साधला.  

कोरोना विषाणूची पहिली लाट मागच्या वर्षी मार्चमध्ये सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन लागले. काही महिन्यांनी लॉकडाऊन उघडताच मुंबई शेअर बाजाराने उसळी मारली. याचाच अर्थ लॉकडाऊनमुळे गरिबापासून मोठ्या व्यवसायिकांपर्यंत सर्वांचेच नुकसान झाले. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. पुन्हा दुसरी लाट सुरु झाल्याने पुन्हा लॉकडाऊन लागले. आताही जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा संसर्ग ओसरत नसल्याने आष्टी, पाटोदा, शिरुर कासार व गेवराई तालुक्यात लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा कडक केले आहेत.

मात्र, हा प्रकार म्हणजे ‘हालगटाला रोग अन् पखालीला इंजेक्शन’असल्याचे धस म्हणाले. या तालुक्यांत जरी अधिक रुग्ण असले तरी काही विशिष्ट गावांतच रुग्णसंख्या अधिक आहे, अशा गावांवर प्रशासनाने फोकस करायला हवे, संपूर्ण गावातील लोकांची कोरोना चाचणी करुन रुग्ण शोधून उपचार केले तर संसर्ग थांबेल. पण, तालुक्यातील एखाद दोन गावांमुळे निर्बंध कडक करुन अख्खा तालुका वेठीस धरला जात असल्याचा गंभीर आरोपही सुरेश धस यांनी केला.

यामुळे शेतकरी, सामान्य, टपरीवाले, हात गाड्यांवर चहा विकणारे अशा हातावर पोट असणाऱ्यांपासून सर्वच घटकांचे कंबरडे मोडले आहे. काही खासगी डॉक्टरांनी ‘कोरोना उपचार किट’ नावाने परस्पर उपचार सुरु केले आहेत. यामुळेही संसर्ग वाढत आहे. अशांचा प्रशासनाने शोध घेतला पाहीजे. संसर्गबाधीतांवर कोविड केअर सेंटर किंवा हॉस्पीटलमध्ये उपचार व्हायला पाहीजेत. संसर्गबाधीतांचा व संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात प्रशासन कमी पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा त्रुटी असताना प्रशासन कुठे चेकपोस्टवर तपासण्या करत असल्याचेही ते म्हणाले.

मृतांची संख्या मोठी, पण नोंद नाही..

कोरोनाच्या दोन्ही लाटांत जिल्ह्यात बळींची संख्या मोठी आहे. पोर्टलवर नोंदणी जरी २६३३ मृत्यूंची झाली असली तरी अद्याप शेकडो मृत्यूंची नोंद नाही. लोक मृत्यूच्या नोंदणीसाठी पुढे येत नाहीत आणि प्रशासन नोंदणी करत नाही. लॉकडाऊनमुळे गेलेला रोजगार, नोकऱ्या आणि कुटूंबातील कर्त्या पुरुषांपासून कुटूंबाला आधार असलेल्या वृद्धांचे मृत्यू यामुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहे. त्यांना या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रत्येक कुटूंबियांची भेट घेत आहोत, सांत्वन करुन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहोत.

मात्र, शासन व प्रशासनानेही यात पुढे येण्याची गरज असल्याचे सुरेश धस म्हणाले. याऐवजी तिसरी लाट येणार, मुलांना धोका आहे, अशी भीती घातली जात आहे. त्यामुळे डिप्रेशन आणखीच वाढत आहे. मात्र, आतापर्यंतचे कोरोनाग्रस्तांचे आकडे पाहीले तर दुसऱ्या लाटेतच मुलांना बाधा झाल्याचे हजारो नोंदी आहेत. मुलांना विविध प्रकारचे लसीकरण झालेले असल्याने त्यांना धोका नाहीच.

असे असतानाही भिती दाखविली जात आहे. लाट येणारच नाही, तरीही काळजी घ्या, आली तर आम्ही समर्थ आहोत, तुमच्या पाठीशी खंबीर आहोत, असा धीर देऊन लोकांची भीती घालविण्याची गरज असल्याचे सांगून ‘मी तरी माझ्या भागात लोकांच्या पाठीशी खंबीर आहे, समर्थ आहे, असेही सुरेश धस यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com