राज ठाकरेंना चंद्रकांतदादा भेटले पण युतीबद्दल काही नाही बोलले...

चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली.
 Chandrakant Patil, Raj Thackeray .jpg
Chandrakant Patil, Raj Thackeray .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (ता. ६ ऑगस्ट ) भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राज ठाकरे यांच्या 'कृंष्णकुंज' निवासस्थानी सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. मात्र, मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही, असे चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil) यांनी सांगितले. (Chandrakant Patil met Raj Thackeray) 

पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, युतीवर चर्चाही झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली होती. दोघेही प्रवासात होतो. त्यावेळी त्यांनी मुंबईत घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. चहा प्यायला बोलावले होते. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो, असे पाटील यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांना प्रदेश कार्यालयात का नाही बोलावले? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, मी अहंकार मानणारा नाही. त्यांनी घरी बोलावले म्हणून गेलो. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. या भेटीत राजकीय चर्चा झाली. मात्र, भाजप आणि मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे विचार सांगणे हा या बैठकीचा विषय होता, असे पाटील म्हणाले. 

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमधे भेट झाली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटे भेटले होते. त्यानंतर पाटील यांनी या भेटीचा तपशील सांगितला होता. पाटील म्हणाले होते की ''राज ठाकरे यांनी मला सांगितले की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्या भाषणांची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठे नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, असे पाटील म्हणाले होते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com