औशात आता पुन्हा रंगणार निलंगेकर विरुद्ध पवार सामना..

अरविंद निलंगेकर यांची प्रदेश सचिवपदी झालेल्या निवडीनंतर आता संभाजी पाटील यांना देखील बळ मिळणार आहे.
Latur Bjp-Nilangekar-Pawar Political News
Latur Bjp-Nilangekar-Pawar Political News

औसा ः गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कट्टर समर्थकाचा पत्ता कापून  तेव्हा भाजपने फडणवीसांचे लाडके अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिली होती. ते निवडूनही आले आणि त्यांनी औशात निलंगेकरांचेच पंख छाटण्याचे काम सुरू केले. (Pawar match against Nilangekar to be played again in Ausa) आता संभाजी पाटील यांनी त्यांचे बंधू अरविंद यांची प्रदेश कार्यकारणीवर वर्णी लावली. प्रदेश सचिव पदी त्यांनी निवड झाल्याने निलंगेकर बंधू आता जुने हिशोब चुकते करण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

संघटन कौशल्य व नियोजनबद्ध यंत्रणा राबवण्यात अरविंद निलंगेकर यांचा हातखंडा असल्याचे सांगितले जाते. (Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar) त्यांच्या या कामाची दखल घेऊनच त्यांना प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष संघटन करत असतांनाच औशाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार व त्यांच्या समर्थकांचे पंख छाटण्याचे काम देखील नव्याने सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लातूर जिल्ह्यात भाजपचे दोन गट असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेतील आमदार रमेशअप्पा कराड हे अभिमन्यू पवार गटाला बळ देतात, अशी देखील चर्चा आहे. ( Bjp Mla Abhimanyu Pawar) नुकत्याच निलंगा तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात कराड यांनी आमदार पवार यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. एवढेच नाही तर जोपर्यंत औसा मतदारसंघ खुला आहे, तोपर्यंत पवार हेच आमदार राहतील, असेही सांगून टाकले.

माजी आमदार पाशा पटेल यांनी देखील अभिमन्यू पवार यांचे कौतुक करतांना त्यांनी कोरोना काळातही केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे कराड आणि पाशा पटेल हे दोघेही अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट होते. तर दुसरीकडे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे स्वतंत्र भूमिका घेऊन काम करतांना दिसत आहेत.

अरविंद निलंगेकर यांची प्रदेश सचिवपदी झालेल्या निवडीनंतर आता संभाजी पाटील यांना देखील बळ मिळणार आहे.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निलंगेकर गटाचे खंदे समर्थक किरण  उटगे यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. पण वरिष्ठ पातळीवरून सुत्रे हलली आणि अभिमन्यू पवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली होती. तेव्हा भाजपमध्ये नाराजी नाट्य देखील रंगले, पवारांच्या विरोधात बंड पुकारले गेले, पण वरिष्ठांनी ते मोडून काढत पवारांची उमेदवारी कामय ठेवली.

पुढे निवडणुकीत अभिमन्यू पवार निवडूनही आले, पण यामुळे निलंगेकर गट प्रचंड नाराज झाला. उमेदवारीला विरोध करणाऱ्या किरण उटगे यांची जिल्हा कार्यकारीणीवर झालेली निवड रद्द करत अभिमन्यू पवारांनी निलंगेकरांना आणखी एक झटका दिला. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर गटात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. आमदार झाल्यानंतर अभिमन्यू पवारांनी संधी मिळेल तेव्हा निलंगेकर गटाला शह दिला.

निलंगेकर एॅक्शन मोडमध्ये..

औशावर पवार यांनी पकड मिळवल्याने निलंगेकर समर्थक हतबल झाले होते.  आमदार संभाजी पाटील यांच्यापेक्षाही धुर्त व संघटनात्मक कामात अरविंद हे तरबेज असल्याचे सांगितले जाते. आता प्रदेश सचिवपदी निवड झाल्यामुळे निलंगेकर गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. औसा मतदारसंघात अरविंद पाटील बरेच बदल घडवून आणतील असा, दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय.

आमदार अभिमन्यू पवार आणि निलंगेकर यांच्यात वरवर जरी सगळं व्यवस्थीत वाटत असले तर या दोघांमधून विस्तव देखील जात नाही, हे लातूरकरांना चागंलेच माहित आहे. त्यामुळे निलंगेकर समर्थक किरण उटगे जे गेल्या विधानसभेत उमेदवारी नाकारली म्हणून नाराज होऊन पक्षकार्यापासून लांब होते, त्यांना नव्याने सक्रीय केले जात आहे. त्यामुळे भविष्यात औसा मतदारसंघात निलंगेकर विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळणार एवढे मात्र निश्चित.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com