पंकजाताई निर्णय घ्या, समर्थकांचा संताप; भूमिकेकडेही लक्ष..

आता राजकिय भुमिका घेण्याची वेळही नाही आणि तसे राज्यात वातावरणही नाही हेच हेरुन भाजपकडून पंकजा मुंडे यांना खिंडीत पकडण्याचे प्रयत्न होत आहेत.
Bjp Leader pankaja munde  news beed
Bjp Leader pankaja munde news beed

बीड : पंकजा मुंडे मास लिडर आहेत, ओबीसी आणि वंजारी समाजाची त्यांना साथ आहे हेच भाजपच्या व काही नेत्यांच्या डोळ्यात सलतंय, अशा संतप्त भावना समर्थकांकडून सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. (Pankajatai decide, the wrath of the supporters; Also pay attention to the role) त्यामुळे निर्णय घ्या, अशी आरोळी समर्थक ठोकत असले तरी आता भुमिका घेण्याची योग्य वेळही नाही आणि राज्यात तसे राजकीय वातावरणही नाही हे हेरुनच भाजपकडून खेळ्या खेळल्या जात आहेत.

अगोदर भागवत कराड यांना राज्यसभेवर खासदारकी व नंतर रमेश कराड यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन एक प्रकारे पंकजा मुंडे यांना चेकमेट देणाऱ्या भाजप नेत्यांनी आता थेट डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद दिले आहे. (Bjp Leader Pankaja Munde) तसे, डॉ. प्रितम मुंडे या दुसऱ्यांदा खासदार आहेत. दोनदाही बहुमताने विजयी झालेल्या आहेत. त्यांच्या भगीनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामागे जनमत आहे. (Bjp Beed Mp Dr. Pritam Munde) पण, तरीही प्रितम मुंडे यांना मंत्रीपद टाळणे त्यांच्या समर्थकांना रुचले नाही.

त्यामुळेच सोशल मिडीयावरुन संताप व्यक्त केला जात आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांची कायम कोंडी केली जातेय असा समर्थकांचा सुरुवातीपासूनचा आरोप आहे. त्यासाठी समर्थक नेहमी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव घेऊन पोस्ट करत असतात. आताही डॉ. प्रितम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्याने समर्थकांचा संताप अनावर झाला आहे.

मुंडे भगिनींचे वेट अॅन्ड वाॅच..

पंकजा मुंडे यांनी निर्णय घ्यावा, अशी साद सोशल मिडीयावरुन घालतानाच भाजपच्या काही नेत्यांना दुषणेही दिली जात आहे. दरम्यान, यापूर्वी रमेश कराड व डॉ. भागवत कराड यांना आमदारकी आणि खासदारकी मिळाल्यानंतर त्यांचे जाहीर अभिनंदन करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर कुठलेही थेट वक्तव्य किंवा सोशल मिडीया पोस्ट केलेली नाही. आता त्या नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com