रावासाहेब दानवेंचे मंत्रीपद टिकले, विरोधकांना पुन्हा चकवा.. - Raosaheb Danve's ministerial post remained, deceive the opposition again .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

रावासाहेब दानवेंचे मंत्रीपद टिकले, विरोधकांना पुन्हा चकवा..

लक्ष्मण सोळुंके
गुरुवार, 8 जुलै 2021

मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांना चकवा म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये आपल्या विरोधकांना हा चकवा दिला आहे.

जालना ः केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात बड्या नेत्यांना मोदींनी नारळ देत त्यांचे राजीनामे घेतले. प्रसार माध्यमांवर सकाळपासूनच याची जोरदार चर्चा सुरू होती. (Raosaheb Danve's ministerial post remained, deceive the opposition again) राजीनामे दिलेल्या मंत्र्यांची नावे, यादी देखील झळकली. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डाॅ. हर्षवर्धन या केबिनेट मंत्र्यांसह बारा जणांच्या या यादीत जालन्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे देखील नाव असल्याचे सांगण्यात आले.

एकीकडे औरंगाबदला डाॅ. भागवत कराड यांच्या रुपाने मंत्रीपद आणि दुसरीकडे दानवेंचा राजीनामा घेतल्याच्या बातम्याने दानवे समर्थकांचे धाबे चांगलेच दणाणले. तर त्यांच्या विरोधकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. (Bjp Leader Central State Minister Raosaheb Danve) सोशल मिडियावर देखील यावरून एकमेकांना चिमटे काढण्याचे प्रकार सुरू झाले. सायकांळी मंत्रीमंडळाचा शपथविधी होईपर्यंत दानवे यांच्या राजीनाम्याची चर्चा होती.

परंतु या बदलाच्या वावटळीत देखील दानवे यांचे मंत्रीपद साबूत राहिल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले. उलट दानवे यांना केंद्रातील महत्वाच्या रेल्वे खात्याचा कारभार सोपवत त्यांना मोठी जबाबदारीही देण्यात आली. सांयकाळी बाजी पलटल्यानंतर पुन्हा दानवे समर्थकांना जोश आला आणि त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत सोशल मिडिया दणाणून सोडले.

मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांना चकवा म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये आपल्या विरोधकांना हा चकवा दिला आहे. काल मंत्रीपदाच्या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांना चकवा दिल्याचा प्रत्यय आला. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह बड्या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

या दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याचीही अफवा उठली आणि कार्यकर्त्यांत नाराजी पसरली. तर दानवे यांच्या जालन्यातील विरोधकांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र मला राजीनामा द्यायला सांगितला नाही, मी राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले.  त्यानंतर मात्र दानवे यांच्या विरोधकांच्या क्षणिक आनंदावरही विरजन पडले.

रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी..

२०१४ मध्ये रावसाहेब दानवे यांना मोदी मंत्रिमंडळात अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र ९ महिन्यांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र तरीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना नाराज केले नाही.  त्यांच्यावर सलग दोनवेळा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला. त्यानंतर पुन्हा भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर त्याच विभागाचं राज्यमंत्रीपद त्यांना सोपवण्यात आलं.

मात्र आता झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात दानवे यांच्याकडे असलेल्या खात्यात बदल करून त्यांच्यावर रेल्वे,कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबादारी सोपवण्यात आली आहे.  महत्वाचे खाते मिळाल्याने दानवे समर्थकांमध्ये चांगलाच आनंद पसरला असून दानवे यांनी पुन्हा विरोधकांना "चकवा"देत चेकमेट दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. 

हे ही वाचा ः डाॅक्टर मंत्री झाले म्हणून जल्लोष, अन् कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख