पंकजा मुंडे यांनीही अनेकांवर अन्याय केला, त्यांना काय वाटत असेल याचाही विचार करा.. - Pankaja Munde also did injustice to many, think about what they think | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

पंकजा मुंडे यांनीही अनेकांवर अन्याय केला, त्यांना काय वाटत असेल याचाही विचार करा..

संतोष जोशी/शिवचरण वावळे
सोमवार, 12 जुलै 2021

भाजपने गोपीनाथ मुंडे यांना खूप काही दिले आहे, त्यामुळे पंकजा मुंडे ह्या घाईघाईत कुठलाही निर्णय घेणार नाहीत.

नांदेड ः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. राज्य सरकार मराठा समाजाला मागास ठरवत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असे मत शिवसंग्राम संघटनेचे नेते, आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले. (Pankaja Munde also did injustice to many, think about what they think) देगलूर बिलोली मतदारसंघाचा दौरा करून नांदेडला आल्यानंतर आमदार मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या काळात अनेकांवर अन्याय केल्याची आठवण देखील मेटे यांनी यावेळी करून दिली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाविकास आघाडी सरकारकडे इच्छाशक्ती नाही, त्यामुळे समाजाच्या प्रश्‍नांना वेगळ्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.( Shivsangram Leader Mla Vinayak Mete) सर्वोच्च न्यायालयात सरकारने योग्यवेळी चांगल्या वकिलांची नेमणूक, आवश्‍यक त्या कागदपत्रांची वेळेत पूर्तता केली असती तर समाज आरक्षणापासून वंचित राहिला नसता. (Bjp Leader Pankaja Munde) या स्थितीला मुख्यमंत्र्यांपेक्षा मराठा आरक्षण उप समितीचे प्रमुख म्हणून अशोक चव्हाण हे देखील तितकेच जबाबदार असल्याचा ठपका मेटे यांनी ठेवला.

राज्यात अनेक प्रश्‍न असताना सरकारने दोन दिवसीय अधिवेशन घेऊन विरोधकांची मुस्काटदाबी केली. घाईघाईत सोईचे प्रस्ताव संमत करुन घेतले, त्यामुळे मराठा - ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा निघू शकला नाही, असेही ते म्हणाले.
देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसंग्राम युतीचा उमेदवार देणार असून चाचपणी सुरु आहे.( Surekha Punekar Nanded) युतीकडून ही जागा मागून घेऊ, असेही मेटे म्हणाले. 

भाजपने गोपीनाथ मुंडे यांना खूप काही दिले आहे, त्यामुळे पंकजा मुंडे ह्या घाईघाईत कुठलाही निर्णय घेणार नाहीत. पंकजा मुंडेना आत्ताच आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्या काळातही त्यांनी अनेकांवर अन्याय केला, त्या लोकांना आता काय वाटत असेल, याचा देखील त्यांनी विचार करावा, असा टोला मेटे यांनी पंकजा मुंडेना लगावला.

पक्ष आणि नेते योग्य निर्णय घेतात, त्याचा आदर केला पाहिजे असेही मेटे म्हणाले. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर रोजच टिका करत आहेत.  रोजच एकमेकावर कुरघोडी करणे सुरू असल्याने हे सरकार शेवटचे दिवस मोजत आहे, अशी भविष्यावाणी देखील मेटे यांनी केली. 

सुरेखा पुणेकरांनी मागितली उमेदवारी..

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक  लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  नांदेड जिल्ह्यातील देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघातून पुणेकर निवडणूक लढविण्यास इच्छूक असून त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे तशी मागणी केली आहे. देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होत आहे.

सुरेखा पुणेकर यांनी कालच देगलूर मतदार संघाचा दौरा केला आणि आज निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.  पुणेकर यांनी देगलूरलाच घर करून राहण्याचा निर्णय घेतला असून  या भागातील समस्या जाणून घेणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. शिवसंग्राम पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडून येऊन मतदार संघात विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा ः मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख