मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला.. - The clean image of the Chief Minister should not be tarnished, so I resigned. | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

मी जर दोषी असेल तर मला शिक्षा करा, दोषी नसेल तर पुन्हा जबाबदारी द्या, या भूमिकेवर मी ठाम आहे.

औरंगाबाद ः मी शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि अठरा वर्ष शिवसेनचा जिल्हाप्रमुख म्हणून संघटनेते काम केलेले आहे. मी कधी आमदार आणि मंत्री होईल असे वाटलेच नव्हते. पण शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आमदार केले आणि मंत्रीपदही दिले. शिवसेनेत मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काम जवळून पाहत आलो आहे. (The clean image of the Chief Minister should not be tarnished, so I resigned.) ते संयमी आणि संवेदनशील आहेत, महाराष्ट्रात एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणूनच माझ्यावर आरोप झाल्यानंतर कुठल्याही चौकशीशिवाय मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला,  असे शिवसेनेचे माजी वनमंत्री आमदार संजय राठोड यांनी सांगितले.

राठोड हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी कन्नड तालुक्यातील वस्ती, तांड्यावर जाऊन वंजारी, भटक्या विमुक्त जातीच्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (Shivsea Ex. Forest Minister Sanjay Rathod) आज आपला दौरा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे येथील पुजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. (Cm Uddhav Thackeray Maharashtra) या प्रकरणाची चौकशी अद्याप पुर्ण झाली नसल्यामुळे राठोड यांना मंत्रीपद मिळू शकलेले नाही.

पत्रकरांनी या संदर्भात छेडले असता, राठोड म्हणाले,  कुठल्याही चौकशी शिवाय एखाद्याला फाशी देण्याचा प्रकार आपल्या बाबतीत घडू नये अशी माझी अपेक्षा होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी चौकशी आधीच मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. ती पुर्ण झाली की नाही याची मला कल्पना नाही. परंतु चौकशी पुर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री माझ्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील.

राहिला प्रश्न पुन्हा मंत्रीपद मिळण्याचा तर तो अधिकार देखील सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचाच आहे. मी जर दोषी असेल तर मला शिक्षा करा, दोषी नसेल तर पुन्हा जबाबदारी द्या, या भूमिकेवर मी ठाम आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मी दौरा करतो आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात समाज बांधवांना भेटता आले नाही. अनेकांनी भेटायला या, अशी मागणी केली होती. त्यानूसार हे दौरे करत आहे. यामध्ये भटक्या विमुक्त जातीजमातींचे प्रश्न जाणून घेवून ते सरकार दरबारी मांडण्याचा आपला प्रयत्न आहे,  असेही राठोड यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा ः भाजपच्या केणेकरांनी भरवला दाशरथेंना पेढा, वाढदिवसाच्या दिल्या मनसे शुभेच्छा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख