भाजपच्या केणेकरांनी भरवला दाशरथेंना पेढा; वाढदिवसाच्या दिल्या `मनसे`शुभेच्छा..

भाजपसोबत मनसे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये युती करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी राज ठाकरे यांचा निर्णय अंतिम असणार आहे.
Bjp-Mns City Chief News Aurangabad
Bjp-Mns City Chief News Aurangabad

औरंगाबाद ः मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचा वाढदिवस आज मनसैनिकांनी विविध उपक्रम राबवत साजरा केला. भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी देखील दाशरथे यांना पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Happy Birthday from BJP to MNS District President) राज्यपातळीवर भाजप आणि मनसेमध्ये वाढत असलेली जवळीक जिल्हास्तरावर देखील दिसून आली.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात देखील भाजप आणि मनसेमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Navniran Sena City Chief Suhash Dashrathe, Aurangabad) मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी मध्यंतरीच्या काळात संभाजीनगरच्या मुद्यावरून शिवसेनेसोबतच भाजपलाही लक्ष्य केले होते. परंतु जसजशा महापालिका निवडणुका जवळ येत आहे, तशी मनसेची भाजप बाबतची भूमिका मवाळ होतांना दिसते आहे.

सुहास दाशरथे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी त्यांचे पुंडलीकनगर शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. (Bjp City President Sanjay kenekar, Aurangabad) दाशरथे यांना पेढा भरवत केनेकर यांनी दाशरथे यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप-मनसेमध्ये निर्माण झालेली जवळीक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका येत्या सहा महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेने आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, महापालिका असो की मग स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इतर निवडणूका, यामध्ये कधीच कोणत्या पक्षाशी युती केलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेहमीच एकला चलो ची भूमिका राहिली आहे. काल पुण्यात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन निमित्ताने देखील त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आपली तीच भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले होते.

मनसे-भाजप युती शक्य?

भाजपसोबत मनसे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये युती करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी राज ठाकरे यांचा निर्णय अंतिम असणार आहे. मुंबई, पुणे किंवा औरंगाबाद महापालिका निवडणुकांना अद्याप अवकाश असल्याने राज ठाकरे यांनी आताच या संदर्भात बोलणे टाळले आहे. उलट केंद्रातील भाजप सरकारवर टीका करायला देखील ते मागेपुढे पहात नाहीयेत. एकीकडे हे चित्र असले तरी औरंगाबादेत मात्र भाजप-मनसेचे सुरू जुळलेले दिसतायेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेचा पारंपारिक मित्र शिवसेना दुरावला आहे. आगामी महापालिका निवडणुक देखील शिवसेना आघाडी करून लढण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर भाजपला देखील एका मित्राची गरज भासणार आहे. मनसेच्या माध्यमातून ही गरज पुर्ण होणार का?  हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. पण आजच्या या चित्राने भाजप व मनसे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतील एवढे मात्र निश्चित.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com