मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुर्वी विरोधकही तयारीत; मनसे विचारणार जाब..

पाणी योजनेसाठी करण्यात आलेला करार देखील फसवा.
Mns-Uddhav Thackeray news Aurangabad
Mns-Uddhav Thackeray news Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाडा मुक्तीसंग्रमा दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणासह विविध विकासकामांचे उद्घाटनस भूमीपूजन, शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी देखील मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याच्या तयारीत आहेत. (Opposition also prepares ahead of CM's visit; MNS will ask) एमआयएमने मुख्यमंत्र्यांचे उपरोधिक स्वागत करण्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरली आहे.

शहरासाठीच्या १६८० कोटीच्या पाणीपुरवठा योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांना जाब विचारून मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पत्रकार परिषदेत दिला. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेकडून जनतेला पाणीपुरवठा योजेनेचे फक्त गाजर दाखवले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

सुहास दाशरथे म्हणाले, १६८० कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना ही फसवी आहे. केवळ योजनेची घोषणा करून नागरिकांची फसवणूक शिवसेनेकडून केली जात आहे. (Maharahstra Navnirman sena, Aurangabad) या योजनेसाठी आवश्यक असलेल्या अनेक विभागांच्या परवानग्याच अद्याप मिळालेल्या नाहीत. मात्र तरी काम सुरू झाल्याचा गवगवा शिवसेनेकडून केला जात आहे. आगामी महापालिकेची निवडणूक पाहता जनतेच्या डोळ्यात नुसती धूळफेक सुरु आहे.

२०-२५ वर्ष महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने आपले अपयश झाकण्यासाठी केवळ योजनांची घोषणा करून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना हा त्याचाच एक भाग असून पर्यावरण, जलसंपदा, रस्ते महामंडळ विभागाची अद्याप योजनेला परवनगीच मिळालेली नसल्याचा दावा देखील दाशरथे यांनी केला.

तरीही शिवसेनेकडून जलवाहिनी टाकण्याचे घाई केली जात आहे. या भूलथापा आहेत, योजनेसाठी शासनाचा ७० टक्के तर ३० टक्के म्हणजे ५०४ कोटी रुपये महानगरपालिकेला भरावे लागणार आहेत. ते अद्याप भरण्यात आलेले नाहीत, किंवा हा पैसा कुठून आणणार याचे उत्तर देखील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल.

पाणी कधी देणार?

पाणी योजनेसाठी करण्यात आलेला करार देखील फसवा असून यावर तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अभियंता सखाराम पानझडे यांचीच सही आहे. जलसंपदा अधिकाऱ्यांनी अद्याप यावर सही देखील केलेली नाही, असा आरोप देखील दाशरथे यांनी केला आहे.

त्यामुळे या सर्व गोष्टींचा जाब आम्ही मुख्यमंत्र्यांना उद्या विचारणार आहोत. शहराला शिवसेनेने चौदा महापौर दिले, विकास केला असा दावा केला जातोय, पण ते जनतेला मुर्ख बनवत आहेत. शिवसेनेने शहर बकाल केले असून लोक आता त्यांच्या भूलथांपांना बळी पडणार नाहीत, असेही दाशरथे म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर शहरात योजनांच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू असून सत्ताधारी भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. तेव्हा  शहराला पाणी कसे देणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे आवाहन करत मनसेने आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. यावेळी सुमीत खांबेकर, गजन गौडा पाटील, अशोक पवार, संदीप कुलकर्णी, विशाल विराळे पाटील आदी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com